News Flash

समुद्र किनारी कतरिनाने केले ग्लॅमरस फोटो शूट, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अत्यंत कमी वेळात आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. तिने बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये स्वत:चे स्थान मिळवले आहे. कतरिनाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. फॅशनसेन्स, उत्तम अभिनयशैली, उत्तम नृत्यकला आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नुकतेच कतरिनाने एक फोटो शूट केले आहे. त्याचा एक व्हिडीओ कतरिनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. कतरिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

कतरिनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत कतरिना समुद्र किनारी फोटो शूट करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये कतरिनाने वेगवेगळे कपडे परिधान केले आहेत. पहिले गुलाबी, दुसरा निळा आणि तिसरा लाल अशा तिन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. कतरिनाने हे फोटो शूट पिकॉक मॅगझीनसाठी केले आहे. कतरिनाचा हा व्हिडीओ आता पर्यंत १३ लाख पेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिनाचा आगामी चित्रपट ‘सुर्यवंशी’ आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतू करोनामुळे प्रदर्शानाची तारिख पुढे ढकलण्यात आली असून हा चित्रपट मार्च मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना सोबत अक्षय कूमार मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 10:20 am

Web Title: katrina kaifs beach glamorous photo shoot video viral dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘तांडव’च्या निर्मात्यांनी मागितली माफी, म्हणाले…
2 इंडियन आयडल स्पर्धकाकडून गरीब असल्याचं नाटक? जुने फोटो व्हायरल
3 हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सासऱ्यांच्या आठवणीत लिहिली भावनिक पोस्ट
Just Now!
X