24 November 2020

News Flash

‘केबीसी’मध्ये बिग बींनी पहिल्याच स्पर्धकाला विचारला सुशांतविषयी ‘हा’ प्रश्न

'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा बारावा सिझन नुकताच सुरू झाला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा बारावा सिझन नुकताच सुरू झाला आहे. करोनाची परिस्थिती असल्याने या शोमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना सहभागी होता आलं नाही. त्यामुळे ‘ऑडियन्स पोल’ हा लाइफलाइन बदलून आता ‘व्हिडीओ अ फ्रेंड’ असा लाइफलाइन ठेवण्यात आला आहे. आरती जगताप या केबीसीच्या पहिल्या स्पर्धक होत्या. या शोमध्ये पहिल्याच स्पर्धकाला अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी प्रश्न विचारण्यात आला.

सुशांतच्या शेवटच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटातील सहकलाकार संजना सांघीबद्दल हा प्रश्न होता. सुशांतच्या मृत्यूनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुशांतसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव काय असा प्रश्न आरती यांना विचारण्यात आला होता. आरती यांनी कोणतीही लाइफलाइन न वापरता या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं. या शोमध्ये त्यांनी ६.४० लाखांची रक्कम जिंकली.

‘न्यू नॉर्मल’ परिस्थितीत केबीसीचं शूटिंग पार पडत आहे. सेटवर अत्यंत कमी लोक, सॅनिटायझेशन, मास्क अशा सर्व सूचनांचं पालन करत या शोची शूटिंग केली जात आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी मृत्यू झाला. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्याच्या मृत्यूनंतर ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 5:47 pm

Web Title: kaun banega crorepati 12 amitabh bachchan asks first contestant a question on sushant singh rajput ssv 92
Next Stories
1 “त्या वेळी रामदास आठवले कुठे होते?”; ‘तो’ फोटो पाहून स्वरा भास्कर संतापली
2 दिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून…
3 RCB-मुंबई सामना पाहून सुनील शेट्टी म्हणाला, “भाई लोग, …”
Just Now!
X