News Flash

बिग बींना आवडला नाही केबीसीमध्ये विचारण्यात आलेला ‘हा’ प्रश्न

जाणून घ्या काय होता प्रश्न

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. सध्या केबीसी १२चे पर्व चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. शोमध्ये हजेरी लावणारे स्पर्धक आणि अमिताभ यांच्यामधील संवाद हे कायमच चर्चेत असतात. पण नुकताच पार पडलेल्या एका भागामध्ये अमिताभ यांना केबीसीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्नच आवडला नसल्याचे समोर आले आहे.

नुकताच पार पडलेल्या भागात दीक्षा कुमारी या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना विचारण्याच आलेला एक प्रश्न अमिताभ यांना आवडला नाही. हा प्रश्न सापाशी संबंधीत होता. प्रश्न-
सरीसृप वर्गातील कोणत्या प्राण्याच्या नावापुढे शिडी जोडल्यानंतर एका खेळाचे नाव तयार होते?

या प्रश्नाचे योग्य उत्तर साप आहे. सापच्या नावापुढे शिडी जोडल्यानंतर सापशिडी या खेळाचे नाव तयार होते.

हा प्रश्न विचारताच बिग बी म्हणाले साप आणि पाल हे त्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे हा प्रश्न देखील माझ्यासमोर का विचारला असे मजेशीर अंदाचा बिग बी म्हणाले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या स्पर्धकांना हसू अनावर होते.

आणखी वाचा : मुंबईशी संबंधीत ‘या’ प्रश्नाला छोट्या स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

दीक्षाने बुद्धीमत्तेच्या जोरावर कौन बनेगा करोडपतीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली आहेत. पण तितक्यात वेळ संपते आणि गेम तेथेच थांबवण्यात येतो. त्यामुळे दीक्षा किती रक्कम जिंकणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 12:52 pm

Web Title: kbc 12 amitabh bachchan desliked kbc question on snake avb 95
Next Stories
1 ‘आश्रम’ या वेब सीरिजला मिळाले तब्बल इतके कोटी व्ह्यूज
2 “यापुढे फक्त नायकच साकारणार”; सोनू सूदने नाकारल्या खलनायकांच्या भूमिका
3 ‘आता मी असं बसू शकत नाही पण..’; गरोदर अनुष्काची भन्नाट पोस्ट
Just Now!
X