News Flash

५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

जाणून घ्या काय होता प्रश्न

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला शो ‘कौन बनेगा करोडपती १२’ कायमच चर्चेत असतो. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोच्या गुरुवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये अनुज कुमार यांनी सहभाग घेतला होता. हॉटसीटवर बसताच अनुज यांनी त्यांना आयुष्यात अनेक गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला असे म्हटले. त्यांनी केबीसीमध्ये ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. तुम्ही देऊ शकाल का या प्रश्नाचे योग्य उत्तर?

अनुज एक इलेक्ट्रिशियन आहेत आणि त्यांना दिवसाला ७७६ रुपये मिळतात. तसेच सध्या त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी २५ लाख रुपये जिंकले. ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न-

पृथ्वीवर आढळलेला सर्वात जुनं खनिज कोणतं?
A-पाइराइट
B-क्वॉट्र्ज
C-वॅनेडियम
D-जिरकॉन

आणखी वाचा: अमिताभ बच्चन यांनी केली रिटायरमेंटची घोषणा? म्हणाले, “मी सर्वांची माफी मागतो पण…”

अनुज यांना विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नव्हते. तसेच त्यांच्या चारही लाइफलाइन संपल्या होत्या. त्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर जिरकॉन असे आहे. अनुज यांनी शोमध्ये २५ लाख रुपये रक्कम जिंकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 1:41 pm

Web Title: kbc 12 anuj kumar mahato could not answer rs 50 lakh question avb 95
Next Stories
1 Video: रणबीरने प्रियांकाला शाहिदच्या नावाने चिडवले अन्…
2 ‘…म्हणून ‘त्या’ भूमिकांकडे आकर्षित होतो’; सैफचा खुलासा
3 ‘आजही अंगावर काटा येतो’; सुशांतच्या ‘त्या’ आठवणीत अंकिता भावूक
Just Now!
X