माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीचे १२ वे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे जिंकताना दिसतात. तसेच ते त्यांच्या आयुष्यातील काही खास किस्से देखील अमिताभ यांच्यासोबत शेअर करताना दिसतात. नुकताच शोमध्ये एका स्पर्धकाने अभिनेत्री कियारा अडवाणीचा फोटो खिशात आणला आहे.
केबीसी १२मध्ये विजय पाल सिंह हे हॉट सीटवर बसले होते. ते बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचे चाहते आहेत. त्यांनी त्यांच्या संपूर्ण घरात कियाराचे फोटो देखील लावले आहेत. शोमध्ये येताना त्यांनी कियाराचा एक फोटो खिशात आणला आहे. दरम्यान विजय यांनी अमिताभ यांना एक इच्छा देखील सांगितली. मला कियाराशी लग्न करायचे आहे. ती माझ्यासाठी खूप लकी आहे असे विजय म्हणाले. ते ऐकून अमिताभ यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या स्पर्धकांना हसू अनावर झाले आहे.
View this post on Instagram
सोनी टीव्हीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये विजय यांनी घरात कियाराचे पोस्टर लावले असल्याचे दिसत आहे.
विजय यांनी केबीसीमध्ये बुद्धीमत्तेच्या जोरावर पन्नास लाख रुपये जिंकले आहेत. जेव्हा विजय यांना १ कोटी रुपयांचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी खिशातून कियाराचा फोटो बाहेर काढला आणि म्हणाले ही माझ्यासाठी लकी आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 3:22 pm