पुण्यातील काठीच्या सहाय्यानं कसरती करणाऱ्या एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांसह सगळेच या आजीच्या मदतीला धावले. मात्र, या आजीला मदत करताना अनेकांनी मदतीचे व्हिडीओ काढले. त्याचबरोबर त्या आजीला पुन्हा त्या कसरती करण्याची मागणीही केली. त्यावरून दिग्दर्शक केदार शिंदे चांगलेच संतापले.

पुण्यातील शांताबाई पवार या आजीचा रस्त्यावर काठ्या फिरवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. हा व्हिडीओ बघून अनेकजण भावनिक झाले. तर काहीजण मदतीसाठीही पुढे धावून आले. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. त्याचबरोबर इतर नागरिकांनाही या आजीला आपापल्या परीनं मदत केली.

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

शांताबाई पवार यांना मदत करणाऱ्यांच्या एका गोष्टीबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. ट्विट करून त्यांना याबद्दलचा संताप बोलून दाखवला. “त्या आजीचा व्हिडीओ गाजतोय. चहूबाजूनं मदत जाहीर होतेय. काहीतर लागलीच पोहोचून मदत करतायेत. करायलाच हवी. पण त्या मदतीचे व्हिडीओ काढणं आणि आजीला पुन्हा तेच तेच करून दाखवायला लावणं किती संयुक्तिक आहे? लाज वाटायला हवी,” असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्र्यांनीही दिला मदतीचा हात

शांताबाई पवार या आजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात असताना आजीची भेट घेतली. यावेळी त्यांनी शांताबाई पवार यांना १ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला होता. तसेच साडी चोळीही भेट दिली होती. पुण्यातील हडपसर परिसरात त्या आपल्या कुटुंबासह राहतात. या वयातही ज्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.