गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड इंडस्ट्रीत घटस्फोटाचे वारे वाहत आहेत. यामध्ये अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांचीही भर पडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, मी आणि सोहा घटस्फोट घेणार नाही, असे सांगत कुणालने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
”माझे लग्न का संकटात येईल? माझे लग्न का तुटेल? लोक काहीही बरळतात”, अशाप्रकारे कुणाल खेमूने ट्विटरवरून घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले. याशिवाय कुणालने यावेळी प्रसारमाध्यमांनाही लक्ष्य केले. एक बार जो मेने कमिटमेंट कर दि तो फिर में अपने प्रेस कि भी नहा सुनता, असे सांगत त्याने प्रसारमाध्यमांना टोला लगावला. कुणाल खेमू आणि पत्नी सोहा अली खान जानेवारी २०१५ मध्ये विवाहबद्ध झाले होते.