गेल्या काही दिवसांपासून ‘केजीएफ चॅप्टर – २’ या चित्रपटाच्या चर्चा रंगल्या आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत दिसणार आहे असून बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. आता अभिनेत्री रवीन टंडन देखील या चित्रपटात दिसणार असल्याचे समोर आले आहे. आज २६ ऑक्टोबर रोजी रवीना टंडन तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत असताना ‘केजीएफ चॅप्टर – २’ चित्रपटातील तिचा लूक समोर आला आहे.

‘केजीएफ चॅप्टर – १’ या चित्रपटात रवीनाने कोणतीही भूमिका साकारली नव्हती. पण आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केजीएफच्या सीक्वेलमध्ये बॉलिवूडमधील काही कलाकरांना घेतले आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि रवीना टंडन हे बॉलिवूड कलाकार दिसणार आहेत.

नुकताच रवीनाचा चित्रपटातील लूक समोर आला आहे. ती रमिका सेन यांची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. दिग्दर्शक प्रशांत यांनी ट्विटर अकाऊंटवर रवीनाचा चित्रपटातील लूक शेअर केला आहे.

आणखी वाचा- या कारणामुळे रवीनाचं अक्षयशी होऊ शकलं नाही लग्न

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो अधीरा हे पात्र साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असे अभिनेता यशने सांगितले होते. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.