जगात आपण अनेक नातीगोती पाहतो. मात्र या साऱ्यामध्ये बहीण-भावाचं नातं अत्यंत निराळं आणि तितकंच खास असतं. त्यातच जर भाऊ मोठा असेल तर विचारायलाच नको. आपल्या बहीणीची लहानशी इच्छादेखील पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. असंच गोड बहीण-भावाचं नातं ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे हा टीझर पाहिल्यानंतर चित्रपटामध्ये खारीची भूमिका साकारणारी ही चिमुकली आहे तरी कोण असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.

खरंतर खारी-बिस्कीट ही आहे चिमुकल्या भावंडांची जोडगोळी. या मधली खारी म्हणजे अवघ्या पाच वर्षांची गोंडस पण अंध मुलगी. ती हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं बेमालूमपणे पाहते. लहानग्या, निरागस अंध खारीचं कास्टिंग हा या चित्रपटाचा एक फार महत्वाचा भाग होता आणि आव्हानही होतं ! त्यामुळे खारीच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकांना प्रचंड मेहनत करावी लागली. इतकंच नाही तर या भूमिकेसाठी अनेक मुलींचं ऑडिशनही घेण्यात आलं.

Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

खारी हे कॅरेक्टर एका पाच वर्षाच्या मुलीचं आहे. त्यातच ती अंध असल्यामुळे तिला आर्टिफिशिअल लेन्स लावण्यात येणार होत्या. सोबतच अभिनय आणि संवाद पाठांतरही तितकंच करावं लागणार होतं. त्यामुळे या भूमिकेसाठी दिग्दर्शकांना प्रचंड शोध घ्यावा लागला. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी तब्बल ३५० लहान मुलींनी ऑडिशन दिलं. मात्र या इतक्या मुलींमधून वेदश्री खाडिलकरची निवड करण्यात आली.

तीन महिन्याच्या ब्लाइंडनेस ट्रेनिंग वर्कशॉप नंतर वेदश्री खारी साकारायला सज्ज झाली. हे आव्हान फक्त तिनं स्वीकारलंच नाही तर पेलवून दाखवलं !”खारी बिस्कीट ही फिल्म माझ्यासाठी फार स्पेशल आहे आणि त्यात खारीचं कास्टिंग अत्यंत महत्वाचं होतं. पण तिनं ज्या पद्धतीनं खारी समजून उमजून साकारलीय त्याला तोड नाही. वेदश्री शिवाय दुसरी खारी होणं शक्य नाही. तिच्या टीजरला आणि गाण्याला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हीच तिच्या मेहनतीची पावती आहे, असं दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितलं.

दरम्यान, या चित्रपटामध्ये बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केली आहे. तर याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या बच्चेकंपनी सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.