News Flash

सलमानपाठोपाठ आता ‘हा’ सुपस्टारही राबतोय शेतात; व्हिडिओ झाला व्हायरल

सलमानकडून प्रेरणा घेत आता हा अभिनेता करतोय शेती

करोना विषाणूमुळे चित्रपट व मालिकांचं थांबलेलं चित्रीकरण आता पुन्हा एकदा सुरु होतं आहे. मात्र अजुनही अनेक कलाकार करोनाच्या भीतीमुळे काम करण्यासाठी मुंबईत परतलेले नाहीत. भोजपूरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता खेसारी लाल यादव याने देखील अद्याप शूटिंगपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी तो शेतात काम करुन आपला वेळ घालवत आहे.

अवश्य पाहा – “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा

खेसारी लाल सलमान खानचा खूप मोठा फॅन आहे. अनेकदा त्याने अभिनय करताना सलमानला फॉलो करत असल्याचं सांगितलं आहे. ऑनस्क्रीनसोबतच आता तो ऑफस्क्रीन देखील तो सलमानला फॉलो करताना दिसत आहे. सलमान पनवेलमध्ये शेती करतोय व खेसारी बिहारमध्ये आपल्या गावी शेती करत आहे. खेसारी लालचा लावणी करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो शेती कशी करायची? याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती देत आहे. त्याच्यासोबत त्याचे गावातील मित्र देखील काम करताना दिसत आहेत.

अवश्य पाहा – …जेव्हा अंकिताने सुशांतला केलं होतं प्रपोज; थ्रोबॅक व्हिडीओ होताय व्हायरल…

खेसारी लाल यादव भोजपुरी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता आहे. खेसारी प्रामुख्याने अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. ‘हम है हिंदूस्तानी’, ‘दबंग सरकार’, ‘भाग खेसारी भाग’, ‘खिलाडी’, ‘कुली नंबर वन’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. खेसारीचे कुटुंबिय शेतकरी आहेत. त्याला देखील शेतात काम करायला प्रचंड आवडते असं त्याने या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 5:19 pm

Web Title: khesari lal yadav farming viral video mppg 94
Next Stories
1 Video : डेव्हिड वॉर्नरच्या लेकींचा भन्नाट ‘बाला’ डान्स
2 “टीव्हीने माझ्यावर बंदी आणली म्हणून बॉलिवूडकडे वळलो”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा
3 सुशांत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार का? अमित शाह यांनी दिलं उत्तर
Just Now!
X