19 September 2020

News Flash

‘इंदू की जवानी’मधलं पहिलं गाणं रिलिज

कियाणा अडवाणी यामध्ये वेगळ्या अंदाजात दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच ‘इंदु की जवानी’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे ‘हसीना पागल दीवानी’ असे नाव आहे. हे गाणे चाहत्यांना प्रचंड आवडले असल्याचे दिसत आहे.

‘हसीन पागाल दीवानी’ हे गाणे गायक मिका सिंगने गायले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच कियाराचा गाण्यातील डान्स पाहण्यासारखा आहे. या गाण्यात कियाराने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे गाणे २८ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

नुकताच प्रदर्शित झालेले ‘हसीना पागल दीवानी’ हे गाणे १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सावन में लग गई आग’ या गाण्याचे रिबूट व्हर्जन आहे. कियाराचा ‘इंदु की जवानी’ हा चित्रपट ५ जून २०२० रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 6:21 pm

Web Title: kiara advani film indoo ki jawani first song avb 95
Next Stories
1 जया बच्चन विरुद्ध कंगना वादात हेमा मालिनींची उडी; म्हणाल्या, “बॉलिवूडबाबत आम्ही…”
2 अभिनेत्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण, सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती
3 ‘दीदी पँट लूज है’ म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिनेत्रीचे भन्नाट उत्तर
Just Now!
X