News Flash

‘या’ अभिनेत्रीमुळे के. एल. राहुल आणि अथिया शेट्टीच्या नात्यात आला दुरावा?

गेल्या काही दिवसांपासून केएल राहुल आणि अथियाच्या रिलेशनच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

बॉलिवूड व क्रिकेट या दोन क्षेत्रांचं नातं फार जवळचं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बॉलिवूड व क्रिकेट विश्वातील बऱ्याच जोड्या चर्चेत राहिल्या आहेत. मग ते विराट-अनुष्का असो किंवा मग जहीर खान-सागरिका घाडगे. अशीच एक जोडी आता चर्चेत आली आहे. ती म्हणजे अथिया शेट्टी व क्रिकेटर के. एल. राहुल. बऱ्याच वेळा अथिया आणि के. एल राहुल एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यांचे फोटो चर्चेचा विषय देखील ठरतात. पण आता त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

के. एल. राहुलच्या आयुष्यात नव्या एका अभिनेत्रीची एण्ट्री झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा के. एल. राहुलने पंजाबी मॉडेल आणि अभिनेत्री सोनम बजवाच्या फोटोवर कमेंट केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. त्याची कमेंट पाहिल्यावर अनेकांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारले आहेत.

आणखी वाचा : किंग खानची मुलगी राहत असलेले न्यूयॉर्कमधील आलिशान घर पाहिलेत का?

आणखी वाचा : ‘माझी विकेट फक्त…’, सायलीच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर CSKच्या ऋतुराजची पोस्ट चर्चेत

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने ‘सूर्य मावळत आहे आणि मी तुझ्याबद्दल विचार करत आहे’ असे कॅप्शन दिले होते. के. एल. राहुलने तिच्या या फोटोवर कमेंट करत ‘बस एक कॉल दूर हू’ असे लिहिले होते. सध्या सोनमची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. के. एल. राहुलची कमेंट पाहून आथिया आणि के. एल. राहुल यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 6:32 pm

Web Title: kl rahul commented on actress post grabs attention avb 95
Next Stories
1 सनी लिओनीच्या गाऊनची चेन अडकली, मदतीसाठी आख्खी टीम सरसावली!
2 अनिकेत आणि मनूच्या प्रेमकहाणीने घेतलं सुंदर वळण
3 ‘धक्कादायकच, कारण…’, अमित कुमार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन
Just Now!
X