News Flash

आलिया भट्टच्या मैत्रिणीशी असलेल्या कथित नात्याबद्दल के. एल. राहुल म्हणतो..

लोकेश राहुलने या मुलाखतीत त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलही खुलासा केला.

के. एल. राहुल, आकांक्षा रंजन

भारतीय क्रिकेटर्स आणि बॉलिवूडचं नातं तसं काही नवीन नाही. अनेक भारतीय क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे संबंध राहिले आहेत. यामधील काहीजण विवाहबंधनातही अडकले. विराट कोहली, हरभजन सिंग, युवराज सिंग यांचं हे नातं लग्नापर्यंत पोहोचलं. क्रिकेटर के. एल. राहुलसुद्धा अथिया शेट्टी, निधी अग्रवाल, सोनम बाजवा या अभिनेत्रींशी असलेल्या कथित नात्यामुळे चर्चेत राहिला. आता या यादीत आणखी एक नाव जोडलं जात आहे ते म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टची खास मैत्रीण आकांक्षा रंजन हिचं.

आकांक्षासोबत असलेल्या कथित नात्यावर राहुल म्हणाला, ”मी वृत्तपत्र वाचत नाही, त्यामुळे माझ्या लिंक-अपच्या चर्चांबद्दल काय लिहिलं जात आहे हे मला माहित नाही. माझं खासगी आयुष्य खासगी ठेवायला मी शिकलोय आणि त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. मी सध्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत आहे.”

आणखी वाचा : ”मी ‘पनौती’ असल्याचं त्याने इंडस्ट्रीत पसरवलं होतं”; तापसी पन्नूने सांगितला धक्कादायक अनुभव 

लोकेश राहुलला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारलं असता तो पुढे म्हणाला, ”मला खरंच माहित नाही. जेव्हा मला समजेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन.” आकांक्षाच्या आधी राहुल हा सुनील शेट्टीची मुलगी अथियाला डेट करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर राहुलला नुकतंच अभिनेत्री निधी अग्रवालसोबत एका हॉटेलमध्ये पाहिलं गेलं होतं. निधी अग्रवालने टायगर श्रॉफसोबत ‘मुन्ना मायकल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 1:36 pm

Web Title: kl rahul on link up rumours with alia bhatt bff akansha ranjan ssv 92
Next Stories
1 नरेंद्र दाभोलकरांचा खून आजही पचवता येत नाही- सोनाली कुलकर्णी
2 अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू थिरकला शाहरुखच्या गाण्यावर, पाहा व्हिडीओ
3 दिग्दर्शकाने बेंबीवर चक्क नारळ फेकला होता- तापसी पन्नू
Just Now!
X