News Flash

जाणून घ्या निकला पहिल्यांदाच भेटल्यावर काय म्हणाली प्रियांकाची आई

मुंबईत विमानतळावरून घरी परतताना निक कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची पुरेपुर काळजी प्रियांकानं घेतली होती.

जाणून घ्या निकला पहिल्यांदाच भेटल्यावर काय म्हणाली प्रियांकाची आई
प्रियांका चोप्रा - निक जोनास

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा कथित प्रियकर निक जोनास सध्या भारतात आले आहेत. प्रियांकानं आपली आई मधू चोप्रा यांना भेटवण्यासाठी निकला भारतात आणल्याचं म्हटलं जात आहे. नुकतीच निकनं मधू यांची भेट घेतली.या भेटीबद्दल जेव्हा मधू यांना विचारलं तेव्हा निकबद्दल फारसं बोलणं त्यांनी टाळलं.

‘निकला मी पहिल्यांदाच भेटत आहे त्यामुळे त्याच्याबद्दल इतक्या लवकर मतप्रदर्शन करणं चुकीचं आहे’ असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या. प्रियांकानं कुटुंबिय आणि मित्रपरिवारासोबत निकची ओळख करुन दिली. त्यानंतर तिच्या परिवारासोबत निक डिनरसाठीही गेला. ‘निकसोबत फारसा वेळ घालवता आला नाही. जेवणाच्या कार्यक्रमासाठी बरीच मंडळी उपस्थित होती त्यामुळे निकशी संवाद साधता आला नाही’, त्यामुळे तूर्त  त्याच्याविषयी मत तयार करणं चुकीचं  असल्याचं मधू चोप्रा म्हणाल्या.

गेल्या आठवड्यात प्रियांका आणि निक भारतात आले. खरं तर मुंबईत विमानतळावरून घरी परतताना निक कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची पुरेपुर काळजी प्रियांकानं घेतली होती. काही दिवसांपूर्वी निकच्या कौटुंबिक कार्यक्रमातही प्रियांका सहभागी झाली होती. यावेळी निकनं प्रियांकाची आपल्या कुटुंबियांसोबत भेट घडवून आणली. आता प्रियांकानंही आपल्या कुटुंबियांसोबत निकची भेट घडवून आणल्यानं या दोघांमध्ये नक्की काय शिजतंय हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 1:41 pm

Web Title: know what priyanka chopra mother said on nick jonas
Next Stories
1 तैमुरचे ‘हे’ नवे सवंगडी पाहिलेत का?
2 भारतात परतलेल्या ‘देसी गर्ल’च्या पदरात पडला आणखी एक चित्रपट!
3 ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ : ‘हा’ अभिनेता साकारणार अटलबिहारी वाजपेयींची भूमिका
Just Now!
X