‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये आठवड्यातून एक दिवस ‘कर्मवीर विशेष’ भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, १७ जुलैच्या भागात अभिनेते ‘नाना पाटेकर’ कर्मवीर म्हणून येणार आहेत.

नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता. त्यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले.

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव
Those who violate the rules of cleanliness will get fine receipt online
मुंबई : स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने दंडाची पावती मिळणार

कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता नाना नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमो मध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत तर या पर्वात पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.