08 March 2021

News Flash

‘काँग स्कल आयलँड’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

हा सिनेमा एक पर्वणीच आहे

'काँग स्कल आयलँड'

हॉलिवूड सिनेमा ‘काँग स्कल आयलँड- राइज ऑफ दी किंग’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. अक्राळ- विक्राळ जीव आणि अॅक्शन सीनचा भडिमार असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला. काही तासांपूर्वी युट्यूबवर शेअर केलेल्या या व्हिडिओला १८ लाखांपेक्षाही अधिक लोकांनी पाहिले आहे आणि १६ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

या ट्रेलरची सुरुवात टॉम हिडलस्टन याच्या एका दृश्याने होते. या दृश्यात तो मृत्यूच्या त्या बेटावर जाण्याचा करार करतो. पण त्या बेटावर असणाऱ्या त्या अजस्त्र प्राण्याचा उल्लेख केलेला नसतो. या सिनेमातली ही कथा १९७१ मधली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमातले कलाकार आणि इतर गोष्टींना त्याच काळातले दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जॉर्डन वोगट रॉबर्ट्स दिग्दर्शित या सिनेमाची निर्मीती वॉर्नर ब्रोस पिक्चर्स या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या सिनेमाचे एकूण बजेट हे १ अब्ज २६ कोटी रुपये इतके आहे. या सिनेमाचे लेखन जॉन गॅटिन्सचे आहे तर टॉम हिडलस्टनशिवाय या सिनेमात सॅम्युअल जॅक्सन, ब्राय लॅन्सन, जिंग टियान यांसारख्या नावाजलेल्या कलाकारांचाही समावेश आहे. २ मिनिटं ४३ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अनेक अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहेत. १० मार्चला हा सिनेमा अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.

‘काँग स्कल आयलँड- राइज ऑफ दी किंग’ हा सिनेमा टूडी, थ्रीडी आणि आयमॅक्समध्ये डॉल्बी साऊंडसह दाखवण्यात येणार आहे. ज्यांना अॅक्शनपॅक्ट आणि थरारक सिनेमे पाहायला आवडतात त्यांच्यासाठी ‘काँग स्कल आयलँड- राइज ऑफ दी किंग’ हा सिनेमा एक पर्वणीच आहे. असे असले तरी हा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात घेऊन येण्यात यशस्वी होतो की नाही हे तर सिनेमाच्या प्रदर्शनानंतरच कळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 8:51 pm

Web Title: kong skull island official trailer release
Next Stories
1 निताराचा ‘रॉक अॅण्ड रोल’ व्हिडिओ पाहिला का?
2 मोदींच्या ‘अच्छे दिन’बाबत केलेले ते ट्विट दारुच्या नशेत; कपिल शर्माची कबुली
3 कादर खान यांच्यावर चुकीची शस्त्रक्रिया
Just Now!
X