अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. त्यासोबतच तिने त्यांच्यासोबतचा एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक तारे-तारकांवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं.
पतीच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीने ही पोस्ट लिहिली आहे. ‘माझ्या विश्वाचं केंद्रबिंदू असलेल्या या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ज्या व्यक्तीवर मी खूप प्रेम करते आणि त्याचा खूप आदर करते. तुझ्यासाठी माझ्या मनात काय भावना आहेत हे सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात. तुला माझ्या आयुष्यात पाठवण्यासाठी मी या विश्वाची फार आभारी आहे. नेहमी खूश राहा. तू ज्या मूल्यांच्या आधारे जीवन जगतोस, तीच तुझी खरी ताकद आहे आणि यासाठी मी तुला सलाम करते’, अशा शब्दांत क्रांती व्यक्त झाली.
View this post on Instagram
पोस्ट केलेल्या व्हिडीओविषयी तिने पुढे लिहिलं, ‘समीर फोटोमध्ये कधीच हसत नाहीत. आम्हा दोघांचे फोटो काढत असताना मी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती आणि अखेर त्यात मी यशस्वी झाले.’
काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. ड्रग्ज पेडलर्सकडून गोरेगाव या ठिकाणी हा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर क्रांतीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित समीर वानखेडेंच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. त्यांच्या पाठिशी कायम उभे राहा अशी विनंती क्रांतीने या वाढदिवसाच्या पोस्टमध्येही केली आहे.