Advertisement

टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ झाली टॉपलेस; सोशल मीडियावर एकच चर्चा

कृष्णा श्रॉफ नेहमीच बोल्ड फोटोज शेअर करत असते. पण यंदा तिने एक टॉपलेस फोटो शेअर केल्यामुळे बरीच चर्चेत आलीय.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॉकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफ याची बहिण कृष्णा श्रॉफने स्वतःला फिल्म इंडस्ट्रीपासून दूरच ठेवलंय. तरी सुद्धा तिचा स्टारडम एका बॉलिवूडमधल्या अभिनेत्रीपेक्षा सुद्धा काही कमी नाही. कृष्णा श्रॉफ तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावर ती नेहमीच बोल्ड फोटोज शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. पण यंदा तिने एक टॉपलेस फोटो शेअर केल्यामुळे बरीच चर्चेत आलीय.

कृष्णा श्रॉफ ही फिटनेस फ्रिक असून तिच्या प्रत्येक पोस्टमधून ती आपली टोंड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसून येतेय. पण यंदा तिने फोटोशूट करताना सगळ्याच मर्यादा पार केल्या आहेत. कृष्णाने तिचे हे टॉपलेसचे फोटोज इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कृष्णाने तिच्या शरीराचा वरचा भाग हाताने कव्हर केलाय. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलीय. यात तिने पॅन्ट अनहुक केली असल्याने तिच्या फोटोशूटमधला हॉट लुक दिसून आलाय.

या फोटोमध्ये कृष्णा तिच्या कमरेवर बनवेला एक टॅटू सुद्धा दाखवताना दिसून येतेय. याशिवाय तिच्या अ‍ॅब्सने सर्व फॅन्सचे लक्ष वेधून घेतलंय. कृष्णाने एका मॅगझीनच्या कव्हरपेजसाठी हे फोटोशूट केलंय. तिचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोंवर फॅन्सनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

 

तर दुसरीकडे तिने शेअर केलेल्या फोटोशूटवरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल सुद्धा केलंय. कृष्णा श्रॉफ एमएमए मॅट्रिक्स फिटनेस सेंटर आणि मॅट्रिक्स फाइट नाइटची संस्थापक सुद्धा आहे. फिटनेसच्या बाबतीत ती आपला भाऊ टायगर श्रॉफला सुद्धा बरोबरीची टक्कर देते. ती कॅमेरा समोर किती आत्मविश्वासाने सामना करते हे तिच्या फोटोशूटवरून कळतं. कृष्णा श्रॉफ बॉलिवूडमध्ये कधी येणार, या प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत पिता जॅकी श्रॉफ आणि भाऊ टायगर श्रॉफ यांनी दिलेलं नाही.

21
READ IN APP
X
X