03 June 2020

News Flash

क्रिती खरबंदाचं सामान गेलं चोरीस; एअर इंडिया म्हणालं…

क्रिती खरबंदाच्या चोरी झालेल्या सामानाबाबत एअर इंडिया म्हणालं....

‘हाऊसफुल्ल ४’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री क्रिती खरबंदा सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना तिचं सामान पुन्हा एकदा चोरी झाले. या प्रकारमुळे क्रिती एअर इंडियावर संतापली आहे.

अवश्य पाहा – फक्त कियाराच नाही, तर या १४ अभिनेत्रीही फोटोसाठी झाल्या होत्या टॉपलेस

अवश्य पाहा – खरचं अमोल कोल्हेंनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’साठी घर विकलं होतं का?

काय म्हणाली क्रिती?

“डियर एयर इंडिया, धन्यवाद. तुमच्या विमानातून प्रवास करताना पुन्हा एकदा माझं सामान चोरीस गेलं. कृपया तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना कसं वागायचं हे जरा शिकवा.” अशा आशयाचं ट्विट करुन क्रितीने एअर इंडियावर उपरोधिक टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – कियाराचा टॉपलेस फोटो वादाच्या भोवऱ्यात; फोटोवर चोरीचा आरोप

... यावर काय म्हणालं एअर इंडिया?

क्रितीच्या या तक्रारीची नोंद एअर इंडियाने गांभिर्याने घेतली आहे. “कृपया आम्हाला माफ करा. तुमच्या सामानाचा रेफरंस नंबर आणि टॅग नंबर पाठवा. तसंच कुठल्या विमानानं तुम्ही प्रवास केला याबाबत माहिती पाठवा. आम्ही लवकरात लवकर तुमचं सामान शोधून देऊ” अशा आशयाचं ट्विट करुन एअर इंडियानं क्रिती खरबंदाची माफी मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 12:42 pm

Web Title: kriti kharbanda gets angry with airlines for losing her luggage mppg 94
Next Stories
1 डोनाल्ड ट्रम्प यांनी केली ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ची स्तुती; म्हणाले…
2 मिका सिंगच्या मॅनेजरने केली आत्महत्या
3 शत्रूघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्नात लावली हजेरी, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X