बहुप्रतिक्षीत असा ‘द कपिल शर्मा शो’ गेल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. खळखळून हसवणारा विनोदाचा बादशहा परतणार याचा प्रेक्षकांना खूपच आनंद झालंय. पहिल्याच भागाला प्रेक्षकांची चांगलीच पसंतीही मिळाली. मात्र या शो साठी कपिलनं आपल्या मानधनात कपात केली अशाही चर्चा सुरू झाल्या. ‘द कपिल शर्मा शो’च्या वीकेंड एपिसोडसाठी जिथे आधी तो ६० ते ७० लाख रुपये मानधन घेत होता. त्याठिकाणी आता कपिल वीकेंड एपिसोडसाठी फक्त १५ ते २० लाख रुपये इतकेच मानधन घेत आहे. तर कॉमेडिअन कृष्णा अभिषेक १० ते १२ लाख मानधन घेत आहे. मात्र कृष्णानं मानधनात कपात केल्याचं वृत्त फेटाळून लावलं असल्याचं समजत आहे.

‘मानधनात कपात करण्यात आल्याचं वृत्त चुकीचं आहे. आम्हाला ठरवून देण्यात आलेलंच मानधन मिळत आहे. मानधानाच्या गोष्टी फारश्या महत्त्वाच्या नाही. आमच्यासाठी एकत्र कारणं ही गोष्टच खूप महत्त्वाची आहे. कार्यक्रमाला पहिल्या भागानंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या कोणत्याच गोष्टीसाठी मानधनाची कपात करण्यात आलेली नाही.’, त्यामुळे या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या असल्याचं कृष्णानं म्हटलं आहे.

कृष्णा आणि कपिल या दोघांमधलं नातं हे कट्टर प्रतिस्पर्धी असंच होतं. मात्र कपिल शर्मा शोसाठी आपल्यातलं वैर विसरून कपिल आणि कृष्णा एकत्र आले. विशेष म्हणजे ही जोडी देखील प्रेक्षकांना तितकीच आवडत आहे.