बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, कजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट हिट चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. या चित्रपटात एका बाल कलाकाराची भूमिका परजान दस्तूरने साकारली होती. त्याने एका डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ’ त्याचा हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता परजान मोठा झाला असून फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्न बंधनात अडकणार आहे.

परजानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गर्लफ्रेंड डेलना श्रॉफसोबतचा फोटो शेअर करत फेब्रुवारी २०२१मध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले आहे. परजानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गर्लफ्रेंडला समुद्र किनारी प्रपोज करतानाचा फोटो शेअर केला आहे. ‘तू एक वर्षापूर्वी हो म्हणाली होतीस. आता ४ महिन्यांनंतर लग्न’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Vodafone Idea FPO, Vodafone-Idea,
विश्लेषण : अर्ज करावा की करू नये.. व्होडाफोन-आयडिया ‘एफपीओ’बाबत तज्ज्ञांचे मत काय?
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
Ravi Shastri Posted a Unique photo on Twitter went viral
रवी शास्त्रींच्या फोटोने सोशल मीडियावर चर्चेला उधाण, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

परजान दस्तूरने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘हम तुम’ चित्रपटाला आवाज दिला होता. २००९ मध्ये त्याने पीयूष झा यांचा चित्रपट ‘सिकंदर’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आता परजानचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. एका मुलाखतीमध्ये परजानने शाहरुख खान सोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.