टीव्ही कलाकार सध्या सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. दरदिवशी ते आपले काही फोटो, व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा वेगवेगळ्या साइट्सवर शेअर करत असतात. या प्रत्येक पोस्टला काही चांगल्या कमेंट येतात तर काही वेळा त्यांचे फोटो ट्रोल केले जातात. यात ‘कुमकुम भाग्य’ फेम टीव्ही अभिनेत्री शिखा सिंहसुद्धा अपवाद नाही. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या शिखाच्या पोस्टवर आरटीओ अधिकाऱ्यानेच एक अश्लिल कमेंट केली आहे. जगदीश घुगे नावाच्या आरटीओच्या अधिकाऱ्याने शिखाच्या पोस्टवर लिहिले की, ‘कृपया अजून हॉट फोटो अपलोड करा. नवीन वर्षाची भेट म्हणून बिकीनीमध्ये काही चांगल्या पोजसह फोटो अपलोड करा.’

जगदीशची कमेंट पाहिल्यावर शिखाने ही व्यक्ती नक्की कोण याचा शोध घेतला. यानंतर तिला तो एक आरटीओ अधिकारी असल्याचे कळले. शिखाने या कमेंटचा स्क्रीन शॉट काढून तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. या पोस्टला कॅप्शन देताना तिने म्हटले की, ‘लोक तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत याचा अर्थ हा नाही के तुम्हाला शिवीगाळ करु शकत नाहीत. गैरवर्तवणूक करणे, मन दुखावणारे शब्द बोलणे… या सगळ्यापासून आपण वाचू शकत नाही. जगदीश घुगे तुला लाज वाटली पाहिजे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बॉलिवूड लाइफ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शिखा म्हणाली की, ‘आमच्या पोस्टवर अनेक प्रकारचे कमेंट येत असतात. पण जेव्हा मी ही कमेंट पाहिली तेव्हा मला ही व्यक्ती नक्की कोण हे पाहायचे होते. माझ्या एका मित्राने त्याची प्रोफाइल तपासली तेव्हा तो पोलीस अधिकारी असल्याचे कळले. जे आपले रक्षण करतात ते कसे आहेत ते सर्वांसमोर यावे म्हणून मी ही पोस्ट शेअर केली.’