संपूर्ण देशात करोना व्हायरसने थैमान घातला आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात करोना व्हायरसचे १३,५०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही रुग्ण संख्या वाढत आहे. करोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता कुशल टंडनने सोशल मीडियाद्वारे जगाला संकटात टाकणाऱ्या चीनचे टिकटॉक अ‍ॅप बंद करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

कुशालने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतीय लोकांना टिक-टॉक अ‍ॅप वापरणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. टिक-टॉक हे चीनचे अ‍ॅप आहे आणि हे अ‍ॅप भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते असे कुशल म्हणाला आहे. चीनला या अ‍ॅपद्वारे पैसे मिळवून देणे भारतीयांनी बंद केले पाहिजे. कारण आज संपूर्ण जग त्यांच्यामुळे संकटात आहे. तसेच कुशलला तो हे अ‍ॅप वापरत नसल्यामुळे अभिमान वाटत आहे.

‘सध्या संपूर्ण जग हे चीनमुळे संकटात आहे. मग टिक-टॉक अ‍ॅपद्वारे भारतीय आणि इतर लोक त्यांना पैसे का कमवून देत आहेत. ज्या लोकांना काम नाहीत अशा लोकांसाठी चीनने हे अ‍ॅप बनवले आहे आणि आपण सगळेच टिक-टॉक वापरतो. टिक-टॉक अ‍ॅप वर बंदी आणा. ते अ‍ॅप मी आतापर्यंत कधी वापरले नाही. त्यामुळे मला माझा अभिमान वाटतो’ असे कुशल म्हणाला आहे.

कुशलच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाइकच्या वर्षाव केला आहे. तसेच अनेकांनी कमेंट करत सहमती दर्शवली आहे. एका यूजरने तर ‘खरच टिक-टॉकवर बंदी आणा’, ‘हो खरच बॅन केले पाहिजे’ असे अनेकांनी म्हटले आहे,