News Flash

‘लागिर झालं जी’ फेम शिवानीचा नववधू लूक व्हायरल

तुम्हाला वाटेल की हा तिचा मालिकेतील लूक असेल, पण तसं अजिबात नाहीये.

शिवानी बावकर

‘लागिरं झालं जी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यात शीतलची भूमिका साकारणारी शिवानी बावकर ही नवअभिनेत्री तर आता महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध झाली आहे. मालिकेतला शीतलचा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडतो आहे. शिवानीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिच्या डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या दिसतात. आता तुम्हाला वाटेल की हा तिचा मालिकेतील लूक असेल, पण तसं अजिबात नाहीये. मग तुम्हाला वाटेल की ती खरोखर लग्न करतेय की काय, तर तसंही नाहीये. या फोटोमागचं गुपित आम्ही तुम्हाला सांगतो.

आपल्या आवडत्या कलाकाराबाबत अधिकाधिक जाणून घ्यायला कोणाला आवडत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलची काही ना काही माहिती आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळते. शिवानीचा नववधू लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवानीचा हा लूक तिच्या आगामी ‘उंडगा’ या चित्रपटातील असल्याचं कळतं. सर्वांची लाडकी झालेली ही अभिनेत्री आता लवकरच तुम्हाला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

‘एक मित्र, एक सखा, एक…. उंडगा’ असे शीर्षक असलेला हा चित्रपट महाविद्यायीन जीवनावर असून दोन मुलांच्या मैत्रीवर आधारलेला आहे. उंगडेगिरी करीत फिरणारा, खोडकर असा गण्या आपल्या महाविद्यालयीन जीवनात फक्त त्याचा लाडका मित्र असलेल्या विज्याच सारं काही ऐकत असतो. याच वयात पहिलं होणार प्रेम, त्यातून उत्कट होणा-या भावना, मनात हळूवार निर्माण होणारी भावाना, आपल्या प्रेमाची चिठ्ठी पोहचविणारी कोमल, प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेणारी जाधव मॅडम याच ज्वलंत उदाहरण आपल्याला या चित्रपटात पहावयास मिळणार आहे. मैत्री आणि प्रेयसी या दोघांमध्ये अंतर ठेवल की मैत्री कशाप्रकारे घट्ट राहते हे आपल्याला यातून पहावयास मिळेल.

या चित्रपटाची निर्मिती सायरा सय्यद आणि सिकंदर सय्यद यांनी केली आहे. विक्रांत वरदेने ‘उंडगा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून सिनेमात चिण्मय संत, स्वप्निल कणसे, संग्राम समेळ, अरूण नलावडे आदींच्या भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 3:53 pm

Web Title: lagir zala ji fame actress shivani baokar will seen in undga movie
Next Stories
1 ‘धकधक गर्ल’ आणि ‘देसी गर्ल’ करणार एकत्र काम
2 कॉमेडीचा ‘बेताज बादशहा’ जॉनी वॉकर यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी..
3 सुशांतकडून क्रितीला वाढदिवसाची सरप्राईज पार्टी?
Just Now!
X