25 February 2021

News Flash

एकता कपूरच्या ‘लैला-मजनू’चा टीझर प्रदर्शित

या चित्रपटाच्यानिमित्ताने एकता आणि इम्तियाज अली एकत्रित काम करणार आहेत.

छोट्या पडद्यावर उत्कृष्ट मालिकांची निर्मिती करणारी एकता कपूर अनेक वेळा चर्चेचा विषय ठरत असते. कधी तिने केलेल्या रोखठोक वक्तव्यामुळे तर कधी तिने केलेल्या मालिका किंवा चित्रपटांमुळे. मात्र सध्या एकता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. एकताच्या आगामी ‘लैला मजनू’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ही माहिती एकता कपूरने तिच्या ट्विटरवर दिली आहे.

‘लैला- मजनू’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी साजिद अली यांनी घेतली असून एकता कपूरच्या बालाजी मोशन्सअंतर्गंत हा चित्रपट साकार होणार आहे. तर या चित्रपटाची पटकथा इम्तियाज अली यांनी लिहीली  आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने एकता आणि इम्तियाज अली एकत्रित काम करणार आहेत. हा चित्रपट २४ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘लैला मजनू’ हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याने त्याचा फर्स्ट लूक देखील १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रदर्शित करण्यात आला होता. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी ‘लैला -मजनू’चा टीझर दाखविण्यात आला. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याची  माहिती एकता कपूरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

प्रदर्शित झालेला हा टीझर केवळ ५७ सेकंदांचा असून यात मुख्य नायक आणि नायिकेचा चेहरा मात्र दाखविण्यात आला नाही. हा टीझर बर्फाळ डोंगररांगांमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. तसेच चित्रपटामध्ये प्रेमकथा असण्याबरोबरच त्यात मैत्रीतील अतूट बंधनदेखील दाखविण्यात आलं आहे. मात्र अद्याप या चित्रपटातील मुख्य नायक आणि नायिकेच्या नावाचा खुलासा झाला नसून कदाचित या चित्रपटाच्या माध्यमातून नव्या चेह-यांना संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 2:38 pm

Web Title: laila majnu teaser release imtiaz ali ekta kapoor
Next Stories
1 Movie Special : तृतीयपंथीयांच्या भावनांचा शोध घेणारा ‘नगरकीर्तन’
2 VIDEO : अनिल कपूर पुन्हा म्हणतोय, ‘माय नेम इज लखन’
3 ‘रेस ३’ चा मेकिंग व्हिडिओ पाहिलात का?
Just Now!
X