26 September 2020

News Flash

शबाना आझमींच्या प्रकृतीसाठी लतादीदींपासून स्वरा भास्करपर्यंत कलाकारांनी केल्या प्रार्थना

शबाना आझमी यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले.

शबाना आझमी

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी शनिवारी दुपारी कार अपघातात जखमी झाल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या कारचा चालक आणि त्या जखमी झाल्या असून दोघांनाही उपचाराासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. शबाना आझमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी अनेक कलाकारांनी प्रार्थना केल्या आहेत. लतादीदींपासून स्वरा भास्करपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासाठी ट्विट केले आहे.

शबानाजी यांच्या अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला… त्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी मी प्रार्थना करेन असं लतादीदी ट्विटद्वारे म्हणाल्या.

स्वरा भास्करनेही त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत असल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे.

‘आर्टिकल १५’चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी अपघाताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका, अशी विनंती नेटकऱ्यांना केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा शबाना आझमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.

शबाना आझमी यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलवण्यात आले. एक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली आणि हा अपघात घडला. कारमध्ये चालक, शबाना आझमी यांच्यासोबत जावेद अख्तरसुद्धा होते. कारचा चालकसुद्धा जखमी झाला आहे. तर जावेद अख्तर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातात आझमी यांच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शबाना आझमी यांच्या नाक आणि तोंडाला मार लागला आहे. दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 7:59 pm

Web Title: lata mangeshkar to swara bhasker celebs pray for shabana azmi speedy recovery ssv 92
Next Stories
1 पूजा सावंतचं बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय
2 मोहन जोशी छोट्या पडद्यावर; राजश्री प्रॉडक्शनसोबत पहिल्यांदाच करणार काम
3 सई मांजरेकरचा अस्सल मराठमोळा लूक; सेलिब्रिटींनाही घातली भुरळ
Just Now!
X