प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं शुक्रवारी निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या बालसुब्रमण्यम यांनी घेतलेल्या एक्झिटमुळे श्रोत्यांसह कलाविश्वातील प्रत्येक सेलिब्रिटीला धक्का बसला आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली असून लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांनीही बालसुब्रमण्यम यांना आदरांजली अर्पण केली आहे.

“प्रतिभावंत गायक, मधुरभाषी आणि एक उत्तम व्यक्ती एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाचं वृत्त ऐकून फार अस्वस्थ वाटत आहे. आम्ही दोघांनी एकत्र अनेक गाणी गायली, गाण्याचे अनेक शो केले. आज ते सगळं आठवतंय.त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे”, असं ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

वाचा : प्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन, मधुर आवाज काळाच्या पडद्याआड!

वाचा : एस.पी.बालसुब्रमण्यम यांची सदाबहार गाणी

दरम्यान, एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी दोन आठवड्यांपूर्वीच करोनावर मात केली होती. मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यामध्येच अचानकपणे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लाउफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.