संगीत हा आपल्या आयुष्याचा एक अभिवाज्य घटक आहे, त्या शिवाय कोणाचेही आयुष्य अपुरेच. शास्त्रीय संगीत असो, लोक संगीत असो किंवा हल्लीचे नवनवीन प्रकार असोत, संगीतकार त्यांच्या व समाजाच्या भावना या माध्यमातून उत्तमरित्या सादर करीत असतो. या मधुर संगीताचा प्रेक्षकांच्या आयुष्यावर होणारा सुरेख असा परिणाम कोणीही नाकारू शकत नाही. त्यातही अधोरेखित करण्यासारखे संगीत म्हणजे लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजत सादर झालेली गाणी.
यापूर्वी देखील लता मंगेशकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशोगाथा मांडणारी अनेक पुस्तके आली, पण आता पहिल्यांदाच त्यांच्या संगीताचा सखोल अभ्यास आपल्या समोर येणार आहे. लेखक अजय देशपांडे यांनी यावेळी लता मंगेशकरांच्या गाण्यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. या पुस्तकात लताजींच्या शास्त्रीय बंदिश, भजन, गीत, तराणा, दादरा, लॉरी, ठुम्री, मुजरा आणि गझल इत्यादींचा याचबरोबर त्यांच्या संगीतातील अनेक घटकांचा सखोल अभ्यास आहे.
लतादीदींच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त अजय यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रदर्शित केले आहे आणि लवकरच लता श्रुती संवाद हे पुस्तक देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 28, 2020 4:52 pm