05 August 2020

News Flash

लॉकडाउनमध्ये ‘लॉ ऑफ लव्ह’; पोस्टरचं डिजिटल अनावरण

मनावरील ताण कमी करण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून होणारी करमणूक नेहमीच उपयुक्त ठरली आहे.

मनावरील ताण कमी करण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून होणारी करमणूक नेहमीच उपयुक्त ठरली आहे. करमणूक हा प्रेरणेचाच एक भाग असून आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक आहे आणि यानंतरही राहणार आहे. लॉकडाउनचा फटका चित्रपटसृष्टीलाही बसला आहे. वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यातून थांबवण्यात आले, चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे नव्या चित्रपटांचे प्रदर्शन तसेच नव्या चित्रपटांचे प्रमोशन रखडले आहेत. मात्र यामुळे खचून न जाता एका सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माता आणि पटकथाकार जे. उदय प्रेक्षकांसाठी नवा मराठी चित्रपट ‘लॉ ऑफ लव्ह’ घेऊन येत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला.

चित्रपटाचं नाव जितकं हटके आहे तितकीच हटके त्याची कहाणी आहे. जे. उदय यांचा हा पहिला चित्रपट आहे. लॉकडाऊननंतर बदललेल्या आयुष्यासाठी हा चित्रपट चांगला पर्याय ठरू शकेल. यामध्ये नक्की कोणकोणते कलाकार असणार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

या चित्रपटाविषयी जे. उदय म्हणाले, “प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, सध्याची परिस्थिती पूर्णपणे जाणता खास सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या लोकांसाठी नवं काहीतरी देण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण केलं आहे. लॉकडाउनच्या काळात उत्सुकता वाढविणे आणि सर्व सुरळीत चालू झाल्यावर प्रेक्षकांना लार्जर दॅन लाइफ अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 11:39 am

Web Title: law of love upcoming marathi movie first look poster released digitally during lockdown ssv 92
Next Stories
1 सलमान जॅकलिनसोबत करतोय बाईक रायडिंग; व्हिडीओ होतोय व्हायरल
2 बुर्ज खलिफामध्ये आहे सुपरस्टार मोहनलालचं घर; लाइफस्टाइलच्या बाबतीत राजा-महाराजांनाही देतात टक्कर
3 “तुझ्या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार”; प्रवीण तरडेंनी शेतकऱ्याला दिला शब्द
Just Now!
X