‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये लक्ष्मीचा विवाह सोहळा जवळपास एक आठवडा रंगला. ज्यामध्ये बरेच चढउतार पाहायला मिळाले. सर्व अडचणींवर मात करत आजीच्या पाठिंब्यामुळे लक्ष्मी आणि मल्हारचे लग्न झाले. लक्ष्मी मामीच्या जाचामधून सुटल्यामुळे आजीलादेखील आनंद झाला. येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना मालिकेमध्ये बऱ्याच रंजक घटना पाहायला मिळणार आहेत. मालिकेमध्ये आर्वी आणि लक्ष्मीची भेट अपघाताने होणार आहे. ज्यामधून हळूहळू त्या दोघींची मालिकेमध्ये चांगलीच गट्टी जमणार आहे.
गावावरून आल्यामुळे आर्वीच्या घराच्या प्रेमात पडणारी लक्ष्मी या गोष्टीशी अनभिज्ञ आहे की, आर्वी मल्हारची होणारी बायको असून तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. आता मालिकेमध्ये आर्वी आणि लक्ष्मी एकमेकींसमोर आल्यानंतर काय होणार? त्यांची मैत्री कशी होईल? कशी आर्वी तिला सांभाळून घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आर्वी लक्ष्मीच्या बऱ्याचश्या गोष्टींना सांभाळून घेताना दिसणार आहे. लक्ष्मी आर्वीला स्वत:चे नाव लच्छी असे सांगणार आहे. पहिल्यांदाच शहरात आल्यामुळे लक्ष्मीला आर्वीच्या घरामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी पाहायला मिळतात आणि ज्याचे तिला खूपच अप्रूप वाटते. या दोघींच्या मैत्रीचे बरेचसे मजेदार किस्से प्रेक्षकांना मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. आईचा विरोध पत्करून आर्वी लक्ष्मीला घरात राहू देणार आहे.

Arti Singh at Kashi Vishwanath to seek blessings before her wedding
लग्नाआधी काशी विश्वनाथच्या दर्शनाला पोहोचली ३९ वर्षीय अभिनेत्री, मंदिरात ठेवलेल्या पत्रिकेने वेधलं लक्ष
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद

Video : ..अन् चालता चालता काजोल पडली

या ऑनस्क्रीन मैत्रीसोबतच सेटवरसुद्धा आर्वी आणि लक्ष्मीची चांगलीच धम्माल मस्ती सुरु असते. सुरभी आणि समृद्धी ऑफस्क्रीनदेखील एकमेंकीच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.