मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा दिवंगत अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. खरंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र,आजही ते प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळेच कलाविश्वात कितीही नवनवीन कलाकार आले तरीदेखील लक्ष्मीकांत बेर्डे यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असं महेश कोठारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे धुमधडाका, दे दणादण, पछाडलेला असे असंख्य चित्रपट तुफान गाजले. विशेष म्हणजे आजही या चित्रपटांची लोकप्रियता तसूभरही कमी न झाल्याचं दिसून येत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 10:37 am