News Flash

रमेश देव निर्मितीअंतर्गत ‘ लेट्स चेंज ’ व ‘ डब्बा गुल ’ या चित्रपटांचे मुहूर्त

मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या रमेश देव प्रॉडक्शन आणि अपार एंटरटेण्मेंटची निर्मिती असलेल्या ‘लेट्स चेंज’

| June 1, 2015 12:54 pm

ramesh-dev01
मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या रमेश देव प्रॉडक्शन  आणि अपार एंटरटेण्मेंटची निर्मिती असलेल्या ‘लेट्स चेंज’  व ‘डब्बा गुल’ या दोन चित्रपटांचे  मुहूर्त करण्यात आले. वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लॅप दिला आणि दोन्ही चित्रपटांचे मुहूर्त करण्यात आले. यापैकी ‘लेट्स चेंज’  सिनेमा हिंदी असून ‘डब्बा गुल’ हा मराठी भाषेत बनणार आहे. सामाजिक आशयाची किनार लाभलेले हे दोन्ही चित्रपट अतिशय रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर केले जाणार आहेत. या दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित आर्य करीत आहेत.
ramesh-dev02
‘लेट्स चेंज’ आणि ‘डब्बा गुल’ या दोन्ही सिनेमांमध्ये स्वच्छता हा मूळ मुद्दा आहे. आज स्वच्छता अभियानाचा मुद्दा ऐरणीवर असताना ‘लेट्स चेंज’ आणि ‘डब्बा गुल’ हे दोन सिनेमे जनमानसांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतील, अशी आशा व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही चित्रपटांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
‘लेट्स चेंज’ या चित्रपटाची कथा स्वच्छता अभियानाभोवती गुंफण्यात आली आहे. हा एक डॅाक्युड्रामा आहे. यात केवळ प्रबोधन करण्यात आलेलं नाही. या चित्रपटाचा विषय विद्यार्थ्यांवर आधारित आहे. ते एक मोहिम राबवतात आणि त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात दिसून येतात. त्यामुळे कोणालाही उपदेशाचे डोस न पाजता अतिशय मनोरंजक शैलीत एक मसालेदार चित्रपट  बनवण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक रोहित आर्य यांनी दिली. तुम्ही स्वतः झाडू मारू नका, पण किमान १५ मिनटे काढून जिथे काम चालू आहे तिथे जाऊन त्यांचा उत्साह तरी वाढवायला हरकत नाही हेच या ‘लेट्स चेंज’ मध्ये सांगण्यात आल्याचं आर्य म्हणाले.
‘डब्बा गुल’ हा मराठी चित्रपट भ्रष्टाचारावर आधारित आहे. आज सरकारतर्फे ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जात आहेत. पण या स्वच्छतागृहांच्या उभारणीतही भयंकर भ्रष्टाचार होत आहे. याचा पर्दाफाश ‘डब्बा गुल’ या चित्रपटात केला जाणार आहें. एकूणच स्वच्छतेसोबत करप्शनच्या मुद्द्यावरही ‘डब्बा गुल’ द्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे. दोन पत्रकारांच्या माध्यमातून ही कथा मांडली जाणार आहे. जर इच्छा असेल तर कोणतंही काम अगदी सहजतेने करता, येत हा संदेश दोन्ही चित्रपटांद्वारे देण्यात येणार असल्याचं रमेश देव यांनी मुहूर्ताप्रसंगी सांगितल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 12:54 pm

Web Title: lets change and dabba gul under ramesh dev production
टॅग : Marathi Movies
Next Stories
1 ‘गंगाजल २’ प्रासंगिक चित्रपट – प्रियांका चोप्रा
2 ‘प्रेम रोग’ चित्रपटाचे नवीन रूप म्हणजे ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ – ऋषी कपूर
3 रुपेरी पडद्यावर ‘खान त्रिकूट’ एकत्र!
Just Now!
X