‘मिस इंडिया’ असो नाहीतर रॅम्पवरची सुपरमॉडेल ‘आता पुढे काय?’ असं विचारल्यावर थोडेसे आढेवेढे घेत ‘बॉलीवूड’ असं उत्तर देऊन टाकतात. आता बॉलीवूडला यशाची पहिली किंवा चौथी पायरी म्हणा किंवा पश्याची मायानगरी.. प्रत्येकाला आपलं नाण इथे चालावं असं मनोमन वाटत असतं. त्यामुळेच तर रोज मुंबईत येणाऱ्या लोंढय़ातले अध्रेअधिक चेहरे गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये तळ ठोकून बसलेले दिसतात. मॉडेल्सची तऱ्हाही फार वेगळी नाही. एखादी भूमिका मिळालीच तर जॅकपॉट नाहीतर मॉडिलग आहेच, असे ठरवून आलेल्यांपैकी एक चेहरा ‘लिसा हेडन’. सुपरमॉडेलचं बिरूद मिळाल्यावर लिसानी तिची गाडी बॉलिवुडकडे वळवली. तिचे मागच्या दोन चित्रपटांनी बॉलिवूडला तिची तोंडओळख करून दिली आहे पण, आगामी कंगना राणावतबरोबरचा ‘क्वीन’ चित्रपट जर चालला तर मात्र तिला इथे पुढची वाट सापडेल..
 ‘एएक्सएन’ वाहिनीच्या आगामी ‘थ्रिलनेअर अवॉर्डस’चं सूत्रसंचालन लिसा करते आहे. ‘एएक्सएन’ वाहिनीच्या या नव्या पुरस्कारांसाठी प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा आणि मालिका निवडता येणार आहेत. या पुरस्कारांच्या माध्यमातून वाहिनी सर्वात मोठय़ा एएक्सएन ‘टोटल थ्रिल जंकी’चा (टीटीजे) शोध घेणार असून विजेत्याला ‘द व्हॉइस’च्या लॉस एंजेलिसमधल्या सेटवर हजर राहण्याची संधी मिळणार आहे. आधी मॉडेिलग नंतर अभिनय आणि आता छोटय़ा पडद्यावर सूत्रसंचालन हे कसं जुळलं? याबद्दल सांगताना हे सगळं योगायोगाने घडल्याचं लिसा सांगते. पार्टटाईम काम शोधता शोधता एकएक संधी मिळत गेल्या आणि मी त्या स्वीकारत गेले. मानसशास्त्राचा अभ्यास करताना इथे राहण्यासाठी म्हणून खोलीचं भाडं देण्यासाठी पसे हवे होते. तेव्हा मत्रिणीच्या सल्ल्यानुसार पहिली फेसक्रीमची जाहिरात केली. नंतर मग हेच क्षेत्र आवडीचं झालं आणि कारकिर्दही इथेच घडवायचं ठरलं. एकदा या क्षेत्रात पाऊल टाकल्यावर मग लिसाने मागे वळून पाहिलंच नाही. आतापर्यंत ‘विल्स फ़ॅशन वीक’, ‘कुटुर फॅशन वीक’ सारख्या नामांकित फॅशन शोजसाठी तिने रॅम्पवॉक केलंय.
 मॉडेिलगची पुढची पायरी म्हणजे चित्रपट. त्यातही तिचं नशीब जोरावर होतं. अभिनेता, निर्माता अनिल कपूर यांच्याशी झालेल्या एका भेटीनंतर सोनम कपूरच्या ‘आयेशा’ चित्रपटातील भूमिका तिला मिळाली. चित्रपट फारसा चालला नाही पण, तिची बॉलिवुडमध्ये प्रवेश मात्र झाला. पुढे डेविड धवनच्या ‘रास्कल’ चित्रपटात तिने एक भूमिका केली. मात्र, आगामी ‘क्वीन’ या चित्रपटाकडून तिला चांगल्या अपेक्षा आहेत. या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल बोलताना लिसा म्हणते,  ‘या चित्रपटात मी विजयलक्ष्मी नामक पॅरीसमध्ये राहणाऱ्या ‘देसी गर्ल’ची भूमिका आहे. विजयालक्ष्मी एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. ती तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण पूर्णत्वाने जगते. ती उत्साहाने भारलेली आहे. अर्थात, पॅरीसमध्ये लहानाची मोठी झाल्याने तिच्या बोलण्यात फ्रेंच ढब दिसून येतो. त्यासाठी मी खास करून फ्रेंच भाषा सुद्धा शिकून घेतली’. विजयालक्ष्मीची व्यक्तिरेखा आपल्याला आवडल्याचं लिसाने सांगितलं. त्याचं कारण सांगताना ती म्हणते, ‘विजयालक्ष्मी आयुष्यात कोणत्याही गोष्टीचं नियोजन करत नाही. याच्या अगदी उलट कंगनाने साकारलेल्या राणीची भूमिका आहे. ती व्यावहारिक आहे. प्रत्येक गोष्टीचे नियोजन करून ती वागते. चित्रपटात जेव्हा विजयालक्ष्मी आणि राणी एकमेकांना भेटतात. तेव्हा राणीचा नवरा तिला सोडून गेलेला असतो. त्यावेळी विजयालक्ष्मी तिला जगण्याची उमेद देते. आयुष्यातल्या प्रत्येक कठीण आणि अनपेक्षित क्षणाला सामोरे जायला शिकवते. कित्येकदा परिस्थिती माणसाला विशिष्ट प्रकारे वागण्यास भाग पाडते. प्रत्येकवेळी सर्वकाही आपल्या हिशोबाप्रमाणे होतं नाही. हे ती राणीला शिकवते आणि तिचं है वैशिष्टय़ मला फार आवडलं’.   एका चित्रपटात दोन अभिनेत्री असल्यानंतर ‘ठिणगी तर उडणारच.’ पण, लिसा ही गोष्ट साफ नाकारते. तिने आतापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांमध्ये एकापेक्षा अधिक अभिनेत्रींबरोबर काम केलंय. कंगनाबरोबरचा तर तिचा हा दुसरा चित्रपट आहे. ‘आतापर्यंत मला तरी असा अनुभव नाही आला’, हे ती प्रांजळपणे मान्य करते. उलट कंगनाबद्दल बोलताना ती म्हणते, ‘कंगना एक व्यावसायिक नटी आहे. ती तिची व्यक्तिरेखा, तिचा अभिनय यशिवाय दुसरं काही बघत नाही. चित्रिकरणादरम्यान आमच्यात फक्त आमच्या भूमिकांविषयी गप्पा व्हायच्या. त्याशिवाय इतरांबद्दल गॉसिप करताना मी तिला कधीच पाहिलं नाही.’ लिसाचा पहिला चित्रपट ‘आयेशा’ स्त्रीप्रधान होता. ‘क्वीन’सुद्धा त्याच धाटणीचा आहे. चित्रपटात नायिकांच्या बदलत्या भूमिकांबद्दल ती म्हणते, ‘सिनेमातील नायिकांच्या भूमिका आता बदलू लागल्या आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या नायिकांच्या भूमिका त्यांच्या वाट्याला येत आहेत, याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. आधीचे दोन चित्रपट तिच्यासाठी खोटे सिक्केच ठरले आहेत. त्यामुळे ‘क्वीन’कडून तिच्या भरपूर अपेक्षा आहेत. या चित्रपटाला यश मिळालं तरच आपलं बॉलिवूडमधलं स्थान पक्कं होईल, अशी आशा लिसाने व्यक्त केली आहे.