21 September 2020

News Flash

आषाढी एकादशीनिमित्त कीर्तनकारांशी लाइव्ह संवाद साधण्याची संधी

१० नामवंत कीर्तनकार लाइव्ह येणार आहे.

आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते, पंढरपूरात दाखल झालेल्या भक्तांची मांदियाळी, चंद्रभागेचा काठ, प्रदक्षिणा मार्ग, भाबड्या भक्तांची आस. पण सध्याच्या काळात लॉकडाउनमुळे भक्तजनांना पंढरीची वारी करणं शक्य नसल्यामुळे झी टॉकीज वाहिनी त्यांच्यासाठी हा उत्सवच घरी घेऊन येणार आहे. झी टॉकीज ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ एक सांगीतिक नजराणा वाहिनीवर रात्री ८.३० वाजता सादर करणार आहे. त्याचसोबत झी टॉकीजच्या फेसबुक पेजवर १० नामवंत कीर्तनकार लाइव्ह येणार आहे. या कठीण काळात पांडुरंगाशी एकरूप होत, सकारात्मक राहण्याची प्रेरणा आणि आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची एक अनोखी संधी झी टॉकीज प्रेक्षकांना देत आहे.

पहिल्यांदाच महाराष्ट्रातील १० सुप्रसिद्ध कीर्तनकार अशा प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये ह.भ.प. भगवती महाराज सातारकर, ह.भ.प. पुरषोत्तम दादा महाराज पाटील, ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील, ह.भ.प. जलाल महाराज सय्यद, ह.भ.प. तुकाराम महाराज मुडे, ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे, ह.भ.प. प्रशांत महाराज ताकोते, ह.भ.प. चारुदत्त महाराज आफळे, ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, ह.भ.प. समाधान महाराज शर्मा या कीर्तनकारांचा समावेश असणार आहे.

गायिका कार्तिकी गायकवाड आणि अभिनेत्री दीप्ती भागवत देखील फेसबुक पेजद्वारे लाइव्ह प्रेक्षकांच्या भेटीस येतील. सकाळी ९ वाजल्यापासून सलग ६ तास हे कीर्तनकार हरी नामाचा गाजर, श्रद्धा, सकारात्मकता, समानता, नाती, शिक्षण, प्रगती, सुखी संसाराचे सूत्र, आरोग्य, मनःशांती अशा वेगवेगळ्या विषयांवर फेसबुकद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 5:22 pm

Web Title: live chat with kirtankar on facebook on the occasion of ashadhi ekadashi ssv 92
Next Stories
1 अभिनेत्रीला लागलं ल्युडोचं वेड; चाहत्यांसोबत ऑनलाइन बसली खेळत
2 Video : उद्धव ठाकरे यांच्या ‘एरियल फोटोग्राफी’तून साकार झालं ‘विठ्ठला’
3 ‘या’ कारणामुळे जॅकलीन सलमानच्या फार्म हाऊसवरुन मुंबईला परतली…
Just Now!
X