News Flash

दीपिकाचंही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू; शूटिंग बंद असलं तरी करतेय ‘हे’ काम

लॉकडाउनमुळे दीपिकाच्या अनेक प्रोजेक्टसं काम अपूर्ण राहिलं आहे

करोना विषाणूमुळे देशात लॉकडाउन सुरु असल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला घरात रहावं लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत घरात बसून प्रत्येक जण कंटाळला आहे. या काळात विविध छंद जोपासून झाले, नव्या गोष्टी शिकून झाल्या. मात्र लॉकडाउनचा कालावधी वाढत असल्यामुळे प्रत्येक नागरिक कंटाळला आहे. हीच अवस्था सेलिब्रिटींचीदेखील झाली आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी घरी राहूनच काम करण्यास सुरुवात केली आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील तिचा मोर्चा कामाकडे वळवला आहे.

बऱ्याच दिवसापासून घरात राहून कंटाळलेली दीपिका तिच्या पुढील प्रोजेक्ट्सकडे वळली आहे. या काळात घरात राहून ती ऑनलाइन पटकथा वाचन (स्क्रीप्ट नरेशन) करत आहे. त्यामुळे सध्या तिचा वेळही जात आणि घरी राहून कामदेखील होत आहे.

 

View this post on Instagram

 

#happysunday

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

सध्याचा काळ डिजिटलचा असल्यामुळे दीपिका व्हर्चुअल मिटींग करुन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी संवाद साधत आहे. तसंच ती व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नवनवीन स्क्रिप्ट्स ऐकत आहे.त्यामुळे दीपिका तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे वळल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, लॉकडाउनमुळे दीपिकाच्या अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं आहे. शकुन बत्रा यांच्या आगामी ‘अनटाइल्ड’ या चित्रपटात दीपिका झळकणार होती. या दिवसांमध्ये श्रीलंकेत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरुदेखील होणार होतं. मात्र हे चित्रीकरण आता लांबणीवर पडलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 11:32 am

Web Title: lockdown actress deepika padukon work from home ssj 93
Next Stories
1 ‘अशी झाली रिअल लाइफमधील रामाशी भेट’; रामायणातील सीतेने सांगितला किस्सा
2 ‘मी नाही तर तेच देशाचे खरे देवदूत…’; नेटकऱ्याच्या कौतुकावर सोनू सूदची भावनिक प्रतिक्रिया
3 लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांना चित्रपटांची मेजवानी; ‘ट्रकभर स्वप्न’मुळे वीकेंड होणार खास
Just Now!
X