News Flash

वरुणने जपली माणुसकी, मतदान केंद्रावर आजींना दिला मदतीचा हात

त्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं. यावेळी राज्यातील नागरिकांसोबतच कलाविश्वातील कलाकारांनीही मतदान करत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अभिनेता वरुण धवनदेखील वडील डेव्हिड धवन यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे मतदान करण्यासाठी आलेल्या वरुणने एका आजींना पायऱ्या चढण्यासाठी मदत केली. वरुणने केलेल्या मदतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या साऱ्यांना जोरात टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

वरुण मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांने एका आजींना पाहिलं. या आजींना मतदान कक्षापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागत होत्या. मात्र या पायऱ्या चढत असताना त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी वरुण पुढे सरसावला. वरुणने या आजींना हात देत मतदानाच्या कक्षेपर्यंत पोहोचवलं.

 

View this post on Instagram

 

#varundhawan #daviddhawan #elections2019 #indiavotes #mumbaikarvote #bollywoodvotes @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

दरम्यान, मतदान केल्यानंतर वरुणने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात ‘मतदान करा आणि आपला हक्क बजावा ‘असं वरुणने म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वीच वरुणचा ‘कलंक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये वरुणसोबत तगडी स्टारकास्ट झळकली आहे. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा भावला नाही. या चित्रपटानंतर वरुणने त्याचा मोर्चा ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ या चित्रपटाकडे वळविला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 11:34 am

Web Title: lok sabha elections 2019 varun dhawan casts his vote helping an old lady climb the stairs
Next Stories
1 ‘मर्दानी’ राणी पुन्हा येतेय..
2 नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना दीपिकाने दिलं ‘हे’ उत्तर
3 बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूवर लवकरच बायोपिक!
Just Now!
X