22 January 2021

News Flash

सागर कारंडेशी थेट संवाद साधण्याची संधी

सहभागी होण्यासाठी रेजिस्ट्रेशन कसं करायचं ते जाणून घ्या..

लॉकडाउनच्या काळातही तुमचं भरभरून मनोरंजन करण्यासाठी विविध सेलिब्रिटींच्या दिलखुलास मुलाखती आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. ज्या अभिनेत्याने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर कधी त्यांना रडवलंसुद्धा.. कलाकारांपासून राजकारण्यांपर्यंत असंख्य व्यक्तिमत्त्वांची त्याने हुबेहूब नक्कल केली.. विनोद हा त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.. असा अभिनेता म्हणजे सागर कारंडे.. ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला हा चेहरा तुमच्याशी गप्पा मारायला येतोय.

उद्या म्हणजेच ८ मे रोजी दुपारी २ वाजता सागर कारंडे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर तुमच्याशी गप्पा मारायला येणार आहे. सागरच्या या डिजिटल मुलाखतीत तुम्हीसुद्धा सहभाग घेऊन त्याला प्रश्न विचारू शकता.

सहभागी होण्यासाठी..

झूम अ‍ॅपच्या माध्यमातून वाचकांना या वेबसंवादात सहभागी होता येईल. सागरला प्रश्न विचारण्यासाठी http://tiny.cc/Loksatta-Digital-Adda1 या लिंकवर क्लिक करून सहभागी व्हायचे आहे. या लिंकवर नोंदणी केल्यावर तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल. या संदेशात देण्यात येणाऱ्या लिंकवर क्लिक करून सहभाग घ्यायचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 3:36 pm

Web Title: loksatta digital adda comedy actor sagar karande video interview ssv 92
Next Stories
1 ‘लवकरच महायुद्ध होण्याची शक्यता आहे…’ अभिनेत्याने खळबळजनक ट्विट
2 “लवकरच महायुद्ध सुरु होणार”; अभिनेत्याचे धक्कादायक वक्तव्य
3 “विशाखापट्टणम वायू गळतीला देवच जबाबदार, कारण…”; दिग्दर्शकाचे ट्विट
Just Now!
X