सोने खरेदी हा सर्वसामान्यांच्या कौतुकाचा विषय. त्यातही दिवाळी सणाच्या निमित्ताने सोने खरेदीचे महत्त्व साहजिकच वाढते. या उत्साहातच सोने खरेदीसाठी दुकानात शिरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या खरेदीसाठी तितकेच चांगले बक्षीस मिळावे आणि त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने सुरू झालेल्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेंतर्गत सोमवारी ‘म्हाळसा’ फेम अभिनेत्री सुरभी हांडेने भेट दिली. एरवी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जय मल्हार’मालिकेत अंगभर पारंपरिक दागिने लेवून वावरणाऱ्या सुरभीने ‘म्हाळसे’च्या रूपातून बाहेर पडून या सुवर्णभेटीचा आनंद अनुभवला.
‘लोकसत्ता’ने प्रस्तावित केलेल्या ज्वेलर्समधून ग्राहकांना सोने खरेदीबरोबर बक्षिसाचा आनंद देणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजनेच्या निमित्ताने अभिनेत्री सुरभी हांडेने गोरेगावमधील प्रसिद्ध ज्वेलर्स ‘वामन हरी पेठे’ आणि अंधेरीतील ‘सँको ज्वेलर्स’ या दुकानांना भेटी दिल्या. ‘जय मल्हार’ मालिकेतून खंडेरायांची पत्नी म्हाळसा हिच्या भूमिकेतून सुरभी घराघरात पोहोचली आहे. म्हाळसा आणि बानूच्या दागिन्यांचा महिलावर्गावर एवढा पगडा आहे की तशाच दागिन्यांची अनेकदा ज्वेलर्सच्या दुकानातून विचारणा होते. मात्र, या सगळ्या गोष्टी मागे टाकून सुरभीने स्वत: काही निवडक दागिने परिधान करून आपली छबी न्याहाळण्याची संधी या निमित्ताने घेतली.
१४ नोव्हेंबपर्यंत ‘लोकसत्ता सुवर्णलाभ’ योजना सुरू राहणार आहे. या योजनेत ग्राहकांना सोने व सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या दुकानांतून ग्राहकांनी तीन हजार रुपयांपर्यंत व त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने व दागिने खरेदी करायचे आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेल्या दागिन्यांवर दुकानातून ग्राहकांना ‘लकी कूपन’ दिले जाणार असून कूपन भरून दुकानातील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकायचे आहे.
या योजनेच्या शेवटच्या दिवशी सहभागी दुकानांमधून सर्व कूपन्स एकत्रित केली जातील. सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. विजेत्यांना कार, परदेशी सहल, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही योजना पॉवर्डबाय गुणाजी एंटरप्राइजेस, प्लॅटिनम पार्टनर, लागूबंधू, वामन हरी पेठे सन्स, गोल्ड पार्टनर, वामन हरी पेठे ज्वेलर्स, सेन्को गोल्ड अॅण्ड डायमंड, सिल्व्हर चिंतामणीज फाइन ज्वेलर्स, श्री नेमिनाथ ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स, ट्रॅव्हल पार्टनर आत्माराम परब संचालित इशा टूर, बँकिंग पार्टनर डीएनएस बँक यांचे सहकार्य लाभले आहे.