21 September 2020

News Flash

संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, पत्नी मान्यता म्हणाली….

देवाने परीक्षेसाठी पुन्हा एकदा आम्हाला निवडलं...

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे. संजय दत्तच्या या आजाराबद्दल पत्नी मान्यता दत्तने आज पत्रक प्रसिद्ध केले. “संजू लढवय्या आहे. आम्ही सर्वजण या परिस्थितीवर मात करुन विजेते म्हणून बाहेर पडू” असा विश्वास मान्यताने व्यक्त केला आहे. संजय दत्तच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या तसेच या आजारातून तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी त्याला शुभेच्छा देणाऱ्यांचे मान्यता दत्तने आभार मानले आहेत. कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे तिने संजय दत्तच्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

“संजय दत्तचे हित चिंतणाऱ्या तसेच तो लवकरात लवक बरा व्हावा, यासाठी शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते. या फेजमधून बाहेर येण्यासाठी आम्हाला बळ आणि प्रार्थनांची आवश्यकता आहे. मागच्या काही वर्षात आमचे कुटुंब अनेक अडचणीतून गेले आहे. हा काळ सुद्धा जाईल” असे मान्यताने म्हटले आहे.

आणखी वाचा- अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, उपचारासाठी परदेशी जाण्याची शक्यता

“संजूच्या चाहत्यांना मी विनंती करते की, त्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये. तुमचे प्रेम आणि पाठिंबा कायम राहूं दे. तुमच्या प्रार्थना आणि आशिर्वादाची गरज आहे. संजू लढवय्या आहे. देवाने परीक्षेसाठी पुन्हा एकदा आम्हाला निवडले आहे” असे मान्यता दत्तने म्हटले आहे.

आणखी वाचा- संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, युवराजने दिला खास संदेश

संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे काल निदान झाले. कालच अभिनेता संजय दत्तने एक ट्विट करुन कामातून ब्रेक घेत आहोत असं म्हटलं होतं. वैद्यकीय उपचारासाठी हा ब्रेक असून मी लवकरच परत येईन असंही संजय दत्तने म्हटलं होतं.

आणखी वाचा- संजय दत्त कामातून घेत आहे ब्रेक; ट्विट करत म्हणाला…

शनिवारी संध्याकाळी संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय दत्तची करोना चाचणीही झाली होती. ज्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 2:31 pm

Web Title: maanayata releases statement on sanjay dutts cancer sanju has always been a fighter dmp 82
Next Stories
1 “..तर मी ‘सडक २’ विरोधात कायदेशीर कारवाई करेन”; अभिनेत्याचा इशारा
2 रियाचा फोन नंबर समजून नवी मुंबईतील तरुणाला धमकीचे कॉल आणि मेसेजेस
3 ‘सत्या’ चित्रपटातील भूमिकेबद्दल महिमा चौधरीचा गौप्यस्फोट
Just Now!
X