26 May 2020

News Flash

११ वर्षांपासून सालस भूमिका साकारणाऱ्या ‘माधवी भिडे’चा हा अंदाज पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

'कलाकारांना नेहमीच हटक्या आणि वेगळ्या भूमिकांची भूक असते आणि ती असलीही पाहिजे,' असं ती या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हणतेय.

अभिनेत्री सोनालिका जोशी

काही मालिका या वर्षानुवर्ष सुरू जरी राहिल्या तरीही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी होत नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही त्यापैकीच एक मालिका आहे. लहानांपासून थोरांपर्यंत आवडणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. या मालिकेत सेक्रेटरी आत्माराम भिडे गुरुजींच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे तिने नुकताच केलेला फोटोशूट. अकरा वर्षे माधवी भिडेची सोज्वळ भूमिका साकारलेल्या सोनालिकाचा हा ‘व्हॅम्पिश लूक’ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सोनालिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहेत. ‘व्हॅम्पिश लूक्स…सोज्वळ आणि साध्या माधवीपेक्षा थोडा हटके. माधवीची भूमिका मी गेल्या अकरा वर्षांपासून साकारत आहे आणि आता थोडंसं आव्हानात्मक काही करायची इच्छा आहे. कलाकारांना नेहमीच हटक्या आणि वेगळ्या भूमिकांची भूक असते आणि ती असलीही पाहिजे,’ असं ती या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हणतेय.

आणखी वाचा : राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच पाच मिनिटांत ४० मिस्ड कॉल्स- आयुषमान खुराना

सोनालिकाने दिलेल्या कॅप्शनवरून ती लवकरच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. सध्या तरी तिचं हे वेगळं रुप चाहत्यांना आवडलं असून त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2019 3:44 pm

Web Title: madhavi bhide aka sonalika joshi vampish look viral on internet ssv 92
Next Stories
1 राज कपूर यांचे या अभिनेत्रीसोबत होते अफेअर
2 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच पाच मिनिटांत ४० मिस्ड कॉल्स- आयुषमान खुराना
3 सलमानच्या चित्रपटात शिवानी सुर्वेची वर्णी?
Just Now!
X