प्रियांका आणि निक जोनास या दोघांचाही गेल्याच आठवड्यात पारंपारिक पद्धतीनं साखरपुडा पार पडला. त्यानंतर दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली. २६ वर्षांचा निक आणि प्रियांका दोघंही येत्या ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. मात्र मधू चोप्रा यांनी या शक्यता फेटाळून लावल्या आहे.

प्रियांका आणि निक दोघंही कामात व्यग्र आहेत. काही कामाच्या वेळा या पूर्वीच ठरल्या होत्या. तसेच लग्नासाठी अजूनही योग्य तारीख अद्यापही ठरली नाही. लग्न कुठे करायचं आणि कोणत्या तारखेला करायचं यावर दोघांच्याही चर्चा सुरू आहेत. मात्र तूर्त कोणालाही घाई नाही. फक्त प्रियांकानं पारंपारिक पद्धतीनंच लग्न करावं एवढीच माझी अपेक्षा आहे असं प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

पण त्यापूर्वी प्रियांका आणि निक जोनास ऑक्टोबरमध्ये लग्न करणार आहेत अशा चर्चा तरी मधू यांनी फेटाळून लावल्या आहेत. २०१७ पासून प्रियांका आणि निक जोनास एकमेकांना डेट करत आहेत. २०१७ साली पार पडलेल्या मेट गालाच्या इव्हेंटमध्ये प्रियांका आणि निक जोनास एकत्र दिसले होते तेव्हापासून या दोघांच्या नात्याची चर्चा आहे.