News Flash

माधुरी-करणचे बुमरॅंग एकदा पहाच !

चित्रपटसृष्टीपासून काही काळ लांब राहिलेली माधुरी चित्रपटसृष्टीत पुन्हा सक्रिय झाली आहे.

माधुरी दीक्षित

बॉलिवूडमध्ये ८०-९० चा काळ गाजविणारी ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित हिच्या लोकप्रियतेमध्ये यत्किंचितही फरक पडलेला नाही. ९०च्या काळापासून तिचा चाहता वर्ग अद्यापही तिच्यावर भरभरुन प्रेम करतो. चित्रपटसृष्टीपासून काही काळ लांब राहिलेली माधुरी चित्रपटसृष्टीत पुन्हा सक्रिय झाली आहे. ‘बकेट लिस्ट’ हा तिचा आगामी मराठी चित्रपटही येत्या २५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चर्चा सुरु असतानाच त्यात आणखी भर पडली ती म्हणजे माधुरीच्या ५१ व्या बर्थडे पार्टीची.

तिच्या या बर्थडे पार्टीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत असून, माधुरीने तिचा वाढदिवस नेमका कशा प्रकारे साजरा केला याचाच अंदाज अनेकांना लावता येत आहे.

मंगळवारी माधुरीने तिचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची रंगत वाढविण्यासाठी दिग्दर्शक करण जोहरनेही हजेरी लावली होती. याच पार्टीमधील माधुरी आणि करणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. माधुरीसह इंन्स्टाग्राममध्ये असलेल्या बुमरॅंगमध्ये काही मजेशीर हालचाली करताना पहायला मिळाला.

एखाद्या व्यक्ती सहज कोणत्या तरी कार्यक्रमाच्या प्रसंगी हजेरी लावून जाते मात्र त्यांची ही उपस्थितीच इतरांसाठी अतिशय महत्त्वाची ठरते, असे सुंदर कॅप्शन माधुरीने या व्हिडिओला दिले आहे. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘धर्मा प्रॉडक्शन’ म्हणजेच करण जोहर हे हिंदीतील नाव मराठीशी पहिल्यांदाच जोडले गेले आहे. हा चित्रपट २५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 9:49 am

Web Title: madhuri birthday celebration with karan johar video viral
Next Stories
1 विकी कौशल म्हणजे बॉलिवूडला मिळालेलं एक मौल्यवान रत्न, जाणून घ्या त्याच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी
2 हॉकी खेळाडूच्या रुपातील तापसीला पाहिलं का ?
3 शब्दांच्या पलिकडले : गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं…
Just Now!
X