News Flash

Video: चिमुकलीसोबत माधुरीचा ‘अखियां मिलाऊं कभी अखियां चुराऊं’वर डान्स

पाहा व्हिडीओ...

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या चित्रपटांसोबतच डान्समुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी माधुरीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती एका चिमुकलीसोबत डान्स करताना दिसत आहे. दरम्यान त्या दोघींचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत.

माधुरीचा हा व्हिडीओ ‘द सिंगर कॅफे’ या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी एका लहान मुलीसोबत सुपरहिट गाणे ‘अखियां मिलाऊं, अखियां चुराऊं (Ankhiya Milau Kabhi Ankhiyan Churau)’वर जबरदस्त एक्सप्रेशन देताना दिसत आहे. त्या दोघींचा हा जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

Drop ” ” If You Love This Founder @mayankyadavvv Follow For More :- @thesingerscafe Second Acc – @indiastalents ________________________ DM us your videos to Get Featured Connect with the Founder @mayankyadavvv #Indiastalents Use In Ur Video For Featuring ________________________ No copyright infringement intended [ DM for Credits / Removal ] _______________________________________ #Indiastalents #Music #Guitarist #indiassinger #TheVoiceIndia2019 #thesingerscafe #mayankyadavvv #risingstar #artist #danceplus5 #igdaily #dilhaihindustani #cokestudio #studio #saregamapalilchamps #biggboss #biggboss13 #biggboss13updates #mtvunpluggeds8 #dancedeewane #superdancer #danceismylife #danceshow #tiktok #indiatiktok #vigovideo #acting #dancing #singing #danceplus

A post shared by Singers Cafe (@thesingerscafe) on

माधुरी आणि तिच्या सोबत असणाऱ्या या लहान मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जवळपास २२ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला असून त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

लॉकडाउनच्या काळात माधुरी कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत होती. काही दिवसांपूर्वी माधुरीचे ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. तसेच ती छोट्या पडद्यावरील एका शोमध्ये परिक्षक म्हणून काम करत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 11:49 am

Web Title: madhuri dixit expressions on ankhiya milau kabhi ankhiyan churau video viral avb 95
Next Stories
1 ‘समजेल का माझी ही रुग्णसेवा ?’; तेजस्विनीने मानले रुग्णसेवकांचे आभार
2 ‘सुशांतला इतक्या सहज विसरलीस?’; ‘या’ व्हिडिओमुळे अंकिता झाली ट्रोल
3 सुशांतच्या मृत्यूवर हृतिक रोशनच्या आईची पोस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Just Now!
X