हिंदीतील एक हुकमी एक्का म्हणजेच बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आता चित्रपट निर्मितीचा अनुभव घेत आहे. तीस वर्षे कॅमेरासमोर काम केल्यानंतर माधुरीने मराठी सिनेसृष्टीची वाट धरली असून ‘१५ ऑगस्ट’ या चित्रपटाची निर्मिती ती करत आहे. नुकतीच तिने चित्रपटाच्या सेटवरील गमतीजमती चाहत्यांसोबत फेसबुक लाइव्हद्वारे शेअर केल्या आहेत.
पती राम नेनेसोबत तिने सेटवरील कलाकारांना सरप्राइज भेट दिली. तर कॅमेरामागील कलाकारांचीही तिने या फेसबुक लाइव्हमध्ये ओळख करून दिली. या चित्रपटात ‘व्हेंटिलेटर’ फेम राहुल पेठे आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिका साकारत आहेत.
VIDEO: …जेव्हा कपूर बहिणी हिलरी क्लिंटनची प्रतीक्षा करतात
योगेश विनायक जोशी याच्या लेखणीतून उतरलेल्या कथेला स्वप्नील जयकर दिग्दर्शित करणार आहे. ‘आरएनएम मुव्हींग पिक्चर्स प्रा. लि.’ या बॅनरअंतर्गत माधुरी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. काही काळ ब्रेक घेतल्यानंतर माधुरी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत सक्रीय झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 16, 2018 1:35 am