02 March 2021

News Flash

आता माधुरी करणार पॉप सिंगिंग

माधुरीचे हा एक इंग्लिश अल्बम आहे

माधुरी दीक्षित

‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच माधुरीच्या ‘कलंक’ चित्रपटातील ‘तबाह हो गए’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले आहे. गाण्यातील माधुरीच्या दिलखेचक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने अनेकांना वेड लावले आहे. आता अभिनय आणि नृत्य व्यतिरिक्त माधुरी गाण्याच्या दुनियेत पाऊल टाकणार असल्याची चर्चा सुरु आहे.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, माधुरी पहिल्यांदाच व्यावसायिक पातळीवर गायन करणार आहे. तसेच तिच्या पहिल्या अल्बम रेकॉर्डींग पूर्ण झाले आहे आणि हा अल्बम या वर्षींच प्रदर्शित होणार असल्याचे माधुरीने सांगितले आहे. सध्या माधुरी ‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्यामुळे अल्बमच्या व्हिडिओचे चित्रीकरण लांबणीवर टाकण्यात आले आहे.

याआधी ही माधुरीने ‘गुलाब गॅंग’ चित्रपटासाठी ‘रंगी सारी’ हे गाणे गायले होते. आता माधुरी पहिल्यांदाच पॉप सिंगिंग करणार आहे. माधुरीचा हा एक इंग्लिश अल्बम आहे ज्यामध्ये सहा पॉप गाण्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच माधुरीचा ‘टोटल धमाल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. आता माधुरी करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटात दिसणार आहे. तिचा हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 1:36 pm

Web Title: madhuri dixit has recorded her first english pop album
Next Stories
1 अन् रणवीर सिंग पोलार्डला म्हणाला राक्षस
2 ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाला स्थगिती; नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
3 शाहरुखनं कोट्यवधींना विकले तब्बल २२ सुपरहिट चित्रपटांचे हक्क
Just Now!
X