18 October 2018

News Flash

माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी सिनेमाचा पोस्टर पाहिलात का?

या सिनेमात रेणुका शहाणेचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित नेने लवकरच तिच्या पहिल्या मराठी सिनेमात काम करणार आहे. माधुरीने मकरसंक्रातीचे औचित्य साधून नुकतेच तिच्या पहिल्या मराठी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘बकेट लिस्ट’ असे या सिनेमाचे नाव असून ‘बकेट लिस्ट… माझी, तुमची…’ आपल्या सगळ्यांची अशी आकर्षक टॅगलाइनही दिली आहे. सामान्य, मध्यमवर्गीय महिलेच्या रुपात माधुरीची छबी पोस्टरवर दिसते.

साडी नेसलेल्या, मंगळसुत्र घातलेल्या माधुरीच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हासू अनेकांचं लक्ष वेधून घेतं. तिच्या मागे गृहिणी, आई, मैत्रिण, बहिण असे शब्द लिहिलेले दिसतात. यावरुनच नात्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा असेल असा प्रथमदर्शी अंदाज लावला जात आहे. तेजस देओस्कर दिग्दर्शित तुमची, आमची सगळ्यांचीच बकेट लिस्ट भरायला येणारा हा सिनेमा येत्या उन्हाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दार मोशन पिक्चर्स, डार्क हॉर्स सिनेमाज् आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून माधुरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले. ‘बकेट लिस्ट’ सिनेमात रेणुका शहाणेचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दोघी तब्बल २३ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. याआधी माधुरी आणि रेणुका यांनी ‘हम आपके है कौन’ सिनेमात बहिणींची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

First Published on January 14, 2018 4:48 pm

Web Title: madhuri dixit nene first marathi film bucket list poster out