08 March 2021

News Flash

लोकांच्या नकळत अक्षय कुमार चोरतो त्यांचे घड्याळ; माधुरी दीक्षितने केला खुलासा

वाचा, अक्षयविषयी माधुरीने काय सांगितलं?

अक्षय कुमार, माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित आणि अक्षय कुमार यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. ‘आरजू’, ‘दिल तो पागल है’ या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. या दोघांमध्ये ऑफस्क्रीन मैत्रीसुद्धा तितकीच चांगली आहे. माधुरीने एका मुलाखतीत अक्षयबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक गोष्ट ऐकून तुम्हीसुद्धा अवाक् व्हाल.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयला अभिनयाव्यतिरिक्त इतरही कला अवगत आहे. लोकांच्या नकळत तो त्यांच्या मनगटावरील घड्याळ चोरू शकतो, असा खुलासा माधुरीने त्या मुलाखतीत केला होता.

आणखी वाचा : जेव्हा भर कार्यक्रमात मीराने केली करण जोहरची बोलती बंद 

या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, माधुरीने ‘कलंक’ या मल्टिस्टारर चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात पुन्हा एकदा माधुरीच्या अप्रतिम नृत्याची झलक पाहायला मिळाली. मात्र या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे अक्षयच्या हातात अनेक चित्रपट आहेत. ‘सूर्यवंशी’, ‘बेल बॉटम’, ‘बच्चन पांडे’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. अक्षयच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये करण्यात येणार आहे. लॉकडाउननंतर परदेशात शूट होणारा हा पहिलाच चित्रपट असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 11:17 am

Web Title: madhuri dixit reveals that akshay kumar steals watches from people without them knowing ssv 92
Next Stories
1 सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने ट्रोलिंगला कंटाळून घेतला ‘हा’ निर्णय
2 Video : विदेशी चिमुकल्यांमध्ये बॉलिवूडची क्रेझ; लंडनच्या रस्त्यावर नोरासोबत धरला ताल
3 Video : जेव्हा भर कार्यक्रमात मीराने केली करण जोहरची बोलती बंद
Just Now!
X