04 December 2020

News Flash

श्रीदेवीच्या गाण्यांवर माधुरीचा नाच!

दोघींनी अभिनेत्री म्हणून सेकंड इनिंग सुरू केली असली तरी आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

एकेकाळी बॉलीवूडमध्ये एकमेकींच्या शत्रू म्हणून त्या टेचात वावरल्या. नंबर वनच्या खेळात कधी मागे-पुढे एकमेकींची स्पर्धा करत, एकमेकींवर कुरघोडी करत श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांची कारकीर्द गेली. मात्र आता इतक्या वर्षांनी या दोन्ही अभिनेत्री वेगवेगळ्या मार्गानी स्थिरावल्या. दोघींनी अभिनेत्री म्हणून सेकंड इनिंग सुरू केली असली तरी आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे स्पर्धा जाऊन निखळ व्यावसायिक संबंध आले असावेत बहुधा.. म्हणूनच माधुरी दीक्षितने आपल्या रिअ‍ॅलिटी शोच्या अंतिम फे रीच्या निमित्ताने चक्क श्रीदेवीच्या गाण्यावर ताल धरला.
‘अँड टीव्ही’वर माधुरी दीक्षित मुख्य परीक्षक म्हणून ‘सो यु थिंक यु कॅन डान्स’ या शोच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आली. स्ट्रीट डान्स आणि स्टेज डान्स या दोन नृत्यप्रकारांत पारंगत असलेल्या नर्तकांमध्ये या शोत स्पर्धा घेण्यात आली होती. आता अंतिम फे रीत पोहोचलेल्या या शोच्या निमित्ताने माधुरीने काही खास गाणी सादर करायची ठरवली. यात तिने पहिल्यांदाच श्रीदेवीच्या गाण्यावर नाच करत तिला सलामी देण्याचा निर्णय घेतला. माधुरीने ‘मेरें हाथों मे नौ नौ चुडियाँ है’ या गाण्यावर नृत्य सादर केले. याशिवाय, माधुरीने ‘सैलाब’ चित्रपटातील तिचे स्वत:चे ‘हमको आजकल है इंतजार’ या गाण्यावर नृत्य केले. शिवाय, दीपिकाच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘दीवानी मस्तानी’ या गाण्यावरही ठेका धरत तिलाही सलामी दिली. मात्र तिने श्रीदेवीच्या गाण्यांवर केलेल्या नृत्याने खरे म्हणजे अनेकांना आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 12:30 am

Web Title: madhuri dixit to dance on sridevi songs
Next Stories
1 चित्ररंग : कोहमपर्यंत नेणारा प्रवास
2 चित्ररंग : उथळ पाण्याला खळखळाट फार
3 एक अभिनेता, एक नाटक आणि एक भूमिका!
Just Now!
X