25 January 2021

News Flash

चिरकाल सुंदर राहण्यासाठी काहीपण; ६२ वर्षीय अभिनेत्रीने केली जीवघेणी सर्जरी

मायकल जॅक्सनच्या एक्स गर्लफ्रेंडने केली ब्युटी सर्जरी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

मडोना ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित सुपरमॉडेल आणि संगीतकार म्हणून ओळखली जाते. ती आपल्या गाण्यांसोबतच आश्चर्यचकित करणाऱ्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. ही ६२ वर्षीय गायिका आपलं सौंदर्य टीकवण्यासाठी सतत विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करत असते. अलिकडेच तिने अशीच एक शस्त्रक्रिया केली. याचे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल.

अवश्य पाहा – मिथून चक्रवर्ती यांची ग्लॅमरस सून; फोटो पाहून व्हाल अवाक्

अवश्य पाहा – अरबाजसोबत लग्न करणार का? जॉर्जिया म्हणाली, “लग्नाचा विचार…”

मडोनाने केलेल्या या शस्त्रक्रियेला कपिंग थेरेपी असं म्हणतात. ही एक एनशियंट चिनी शस्त्रक्रिया आहे. राजेशाहीच्या काळात चीनमधील श्रीमंत महिला आपलं सौंदर्य दिर्घकाळ टिकवण्यासाठी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करायच्या. मात्र या शस्त्रक्रियेमुळे त्या काळात अनेक स्त्रियांचे मृत्यू देखील झाले होते. त्यामुळे या थेरेपीवर बंदी घालण्यात आली असं म्हटलं जातं. मात्र आजही काही देशांमध्ये अद्यायावत तंत्रज्ञानाच्या मदतीने ही थेरेपी केली जाते. या शस्त्रक्रियेमुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो अन् त्यामुळे शरीरावर येणाऱ्या सुरुकुत्यांना नियंत्रणात ठेवलं जाऊ शकंत. अलिकडेच मडोनाने ही कपिंग थेरेपी थेरेपी केली अन् त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अवश्य पाहा – ऑनस्क्रीन ‘नागिन’चा बोल्ड अंदाज; पाहा ग्लॅमरस मौनीचं बिकिनी फोटोशूट

मडोना ही एक नामांकित गायिका, संगीतकार, अभिनेत्री आणि सुपरमॉडेल म्हणून ओळखली जाते. १९८५ साली ‘रेस्क्यु’ या म्युझिक अल्बममधून तिने आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ल्युसी स्टार, हॉलिडे, बर्निंग अप, आय नो इट यांसारख्या अनेक सुपरहिट अल्बमची निर्मिती तिने केली. ९० च्या दशकात ती जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनला देखील डेट करत होती. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र या रिलेशनशिपमुळे मडोला खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. आज तिला किंग ऑप क्विन म्हणून ओळखले जाते. आज वयाच्या ६२ व्या वर्षीही ही संगीतकार रुपेरी पडद्यावर कार्यरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 1:54 pm

Web Title: madonna cupping treatment beautiful scar see photos mppg 94
Next Stories
1 “सीबीआयने अजूनही सांगितलं नाही, सुशांतची हत्या की आत्महत्या?”; देशमुख यांचा सवाल
2 प्रणाली चव्हाण ठरली ‘डान्सिंग क्वीन- साईज लार्ज फुल चार्ज’ची विजेती
3 “तू पुन्हा गरोदर आहेस का?”; चाहत्याच्या प्रश्नाला मीरा राजपूतने दिलं ‘हे’ उत्तर
Just Now!
X