03 March 2021

News Flash

Maharashtra Day: यांनी अक्षय कुमारला दिले मराठीचे धडे

'मी आज जे काही मराठी बोलतोय, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीची भेट घेण्याची संधी मला मिळाली. या... माझ्या मराठीच्या शिक्षिका.

अक्षय कुमार

शालेय आयुष्यातील प्रत्येक दिवस, नाही म्हणता अधिकाधिक काळ प्रत्येकाच्याच स्मरणात असतो. शाळा म्हणजे एक व्यक्ती म्हणून आपल्याला घडवणारी संस्थाच. आपल्या भवितव्याचा पाया रचणाऱ्या या शाळेमध्ये असे काही शिक्षक आणि शिक्षिका असतात, ज्यांचं आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. खिलाडी कुमारच्या आयुष्यातही अशा एका शिक्षिकेचं स्थान असून, त्याने सोशल मीडियावर शाळेतील बाईंसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अक्षयने शाळेतील मराठी शिकवणाऱ्या शिक्षिकेची भेट घेत या खास क्षणांचा फोटो पोस्ट केला आहे. ‘मी आज जे काही मराठी बोलतोय, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीची भेट घेण्याची संधी मला मिळाली. या… माझ्या मराठीच्या शिक्षिका. आजचा दिवस त्यांची भेट घेण्यासाठी अतिशय योग्य आहे’, असं त्याने या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

वाचा : जेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सेलिब्रिटी विविध मार्गांनी या खास दिवसाच्या शुभेच्छा देत असताना अक्षयने केलेली ही पोस्ट सध्या सर्वांचंच लक्ष वेधत आहे. ‘टाईम्स नाऊ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार २०१६ मध्ये एका चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी त्याने याच मराठीच्या बाईंविषयी एक गोष्ट सांगितली होती. प्रत्येकाच्या शाळेत एखाद्या विषयाच्या शिक्षिका अशा असतात ज्या सर्वांच्याच आवडत्या असतात. या मराठी शिकवणाऱ्या बाईंसाठी अक्षयच्या मनात असंच आदयुक्त प्रेम असल्याचं सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 1:25 pm

Web Title: maharashtra day bollywood actor akshay kumar posts photo with his marathi teacher who also was his first crush in school
Next Stories
1 Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात असा साजरा होणार ‘महाराष्ट्र दिन’
2 आणखी एका सेलिब्रिटी किडच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत चंकीने केला ‘हा’ खुलासा
3 गुपचूप केलं लग्न? अखेर प्रियांकानं सोडलं मौन!
Just Now!
X